Rahuri By Election : राहुरी पोटनिवडणुकीत उमेदवार ठरला! भाजपकडून अक्षय कर्डिले यांना उमेदवारी जाहीर

राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना उमेदवारी देण्यात आलीयं.

Untitle (8)

Rahuri By Election : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचा उमेदवार ठरला असून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले (Akshay Kardile) यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे.

WhatsApp Image 2026 04 01 At 11.20.05 AM

WhatsApp Image 2026 04 01 At 11.20.05 AM

लिएंडर पेस भाजपमध्ये ; आतापर्यंत कोणत्या खेळाडूंनी निवडला राजकारणाचा रस्ता ?

भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती. तेव्हापासूनच राहुरीची निवडणूक कधी लागणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर बारामती विधानसभा आणि राहुरी विधानसभेच्या निवडणुकीच्या तारखा निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आल्यानंतर हालचालींनाही वेग आला होता.

काही दिवसांपूर्वीच भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपकडून आम्ही अक्षय कर्डिले यांचं नाव सुचवलं असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच अक्षय कर्डिले यांनाच भाजपची उमेदवार मिळणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. अखेर आज भाजपकडून अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

चाळीशीच्या आत मेनोपॉज धोक्याची घंटा? अहवालातून समोर आला धक्कादायक खुलासा

बारामती आणि राहुरीच्या पोटनिवडणुकीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील महत्वाचं विधान केलं होतं. दोन्ही विधानसभा मतदारसंघात बिनविरोध निवडणूक व्हावी, अशी आमची भूमिका असल्याचं फडणवीसांनी सांगितलं होतं. मात्र, जर निवडणूक लढवण्याची वेळ आल्यास आम्ही निवडणूक देखील लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

दिग्गज कलाकारांच्या प्रभावी अभिनयाने साकारलेला ‘राजा शिवाजी’ फर्स्ट लूक आता डिजिटलवर

2024 च्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांचे प्रतिस्पर्धी होते. या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांनी मोठं मताधिक्क्य घेऊन तनपुरे यांनी पराभवाची धूळ चारली होती. आता पुन्हा पोटनिवडणूक लागल्याने महाविकास आघाडी ही निवडणूक लढवणार का? लढवल्यास पुन्हा भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्याविरोधात प्राजक्त तनपुरेंनाच उमेदवारी देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

follow us