Download App

नवाब मलिक सत्ताधारी बाकावर; ठाकरेंच्या वाघाने शिंदे-फडणवीसांना खिंडीत गाठले!

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक (Nawab Malik) यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या निर्णयाने आज (7 डिसेंबर) अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी गदारोळ पाहायला मिळाला. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खिंडीत गाठत त्यांनीच ज्यांच्यावर दहशतवाद्यांशी संबंध असल्याचे आणि दाऊद इब्राहिमसोबत व्यवहार केल्याच्या आरोप केले त्यांच्याच मांडीला मांडी लावून बसले असल्याचा दावा केला. तसेच आता मलिकांवरील आरोपांबाबत सरकारची भूमिका काय आहे, असा सवाल केला. (mbadas Danve questioned Chief Minister Eknath Shinde, Deputy Chief Minister Devendra Fadnavis against Nabav Malik.)

यावर उपमुख्यमंत्री फडणवीस यांनीही दानवे यांना प्रत्यूत्तर देत आम्ही कोणाच्याही मांडीला मांडी लावून बसलेलो नाही असे सांगितले. ते म्हणाले, मी मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे, माझ्या मांडीला मांडी लावून अजितदादा बसले आहेत. त्यामुळे तुम्ही त्याची काळजी करु नये. पण ज्यांचा दहशतवाद्यांशी संबंध होता, ज्यांच्या व्यवहार होता त्यांचा राजीनामा का घेतला नाही? ते जेलमध्ये असतानाही त्यांना मंत्रिपदावर कायम का ठेवले? अशा नेत्यांनी आमची भूमिका विचारण्याआधी त्यांनी मलिक यांचा राजीनामा का घेतला नाही? याचे उत्तर द्यावे, असा प्रतिप्रश्नही केला.

साहेब की दादा? अखेर नवाब मलिकांचे ठरले; अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच स्पष्ट सांगितले!

मलिक सत्ताधारी बाकावर :

ED ने मंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि त्याच्याशी संबंधित मालमत्तांच्या खरेदीत पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला आहे. ईडीकडून 5 हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. कुर्ला येथील जमीन खरेदी प्रकरणात पैशांच्या व्यवहाराच्या आरोपावरून ईडीने त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी नवाब मलिक यांना अटक करण्यात आलेली होती. मात्र या प्रकरणात न्यायालयाने त्यांना तब्बल दीड वर्षानंतर जामीन मंजूर केला. त्यानंतर मलिक काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण’.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक

दरम्यान, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मलिक यांनी सत्ताधारी बाकावर बसून अजित पवार यांना पाठिंबा असल्याचे अप्रत्यक्षरित्या जाहीर केले. याचवरुन सध्या गदारोळ माजला आहे. आतापर्यंत मलिकांची ओळख शरद पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून आहे. मलिक तुरुंगातून बाहेर पडताच त्यांचे अजित पवार (Ajit Pawar) गटासह शरद पवारांच्या गटातील नेत्यांनी जंगी स्वागत केले होते. दरम्यान, मलिकांसाठी त्यांच्या मुलीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मलिकांच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले होते.

follow us

वेब स्टोरीज