Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण’.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक

Uddhav Thackeray : ‘हिंदु्त्व’ हा भाजपासाठी राजकीय खेळ पण’.. ; संसदेतील घटनेवरून ठाकरे गट आक्रमक

Uddhav Thackeray : देशातील पाच राज्यांतील निवडणुकांत तीन राज्यात घवघवीत यश (Election Results 2023) मिळाल्याने भाजपाचा आत्मविश्वास वाढला आहे. यानंतर आता संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू झाले आहे. या अधिवेशनात आक्रमक होण्याची संधी विरोधकांना मिळाली आहे. या अधिवेशनातील घडामोडींचे पडसाद राज्याच्या राजकारणावरही पडत आहेत. द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार यांनी केलेल्या विधानामुळे मोठा गदारोळ उठला. नंतर त्यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती. यावर आता उद्धव ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपासाठी हिंदुत्व हा एक राजकीय खेळ आहे आणि त्याला हिंदी पट्ट्यात जास्त बरकत आली आहे, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाने केली आहे.

भाजपने तीन राज्यांत यश मिळवल्यानंतर लोकसभेतील एका भाषणात द्रमुकचे खासदार सेंथिलकुमार यांनी भाजपला फक्त हिंदी पट्ट्यातील राज्यांतच यश मिळतं. आम्ही त्यांना गोमूत्र राज्य म्हणतो. त्यांच्या या विधानावर भाजपने तीव्र आक्षेप घेतला. एक दिवस जोरदार राजकारण झाल्यानंतर सेंथिलकुमार यांनी या वक्तव्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. या प्रकारावरून ठाकरे गटाने भाजपला फैलावर घेतले आहे.

Uddhav Thackeray : हिंमत दाखवा, बॅलट पेपरवर निवडणुका घ्या! PM मोदींना ठाकरे गटाचे ‘गॅरंटी’चे आव्हान

भाजपासाठी हिंदुत्व राजकीय खेळ 

प्राण जाय पर वचन ना जाय हाच खऱ्या हिंदुत्वाचा मंत्र आहे. पण मागील आठ वर्षांच्या काळात किती वचनांची पूर्तता झाली असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. बेरोजगारी जैसे थे. कोट्यावधी हिंदू बेरोजगार आहेत. मोफत रेशन देऊन लोकांना भिकारी बनवणे हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. प्रश्न इतकाच आहे की भाजपासाठी हिंदुत्व हा एक राजकीय खेळ आहे आणि त्याला हिंदी पट्ट्यात जास्त बरकत आली आहे, अशी खरमरीत टीका ठाकरे गटाने केली आहे.

कुणी काय खावं, कोणते कपडे घालावेत हे सगळं हेच ठरविणार. निवडणुकात असे मुद्दे पेटवायचे आणि त्यावलर स्वतःच्या राजकीय पोळ्या भाजून घ्यायच्या. राजस्थानात भाजपाची सत्ता आल्यानंतर लगेच एका खासदाराने रस्त्यावरील नॉन व्हेजची दुकाने आणि मांसाहारी हॉटेल बंद करण्याचा प्रयत्न केला, असे हिंदुत्व काय कामाचे, असा सवाल ठाकरे गटाने केला आहे. सध्याचा भाजप देशाबरोबर हिंदुत्वाला सोवळ्यात व शेंडी जानव्याच्या गाठीत अडकवून ठेऊ इच्छित आहे.

भाजपाचे हिंदुत्व सगळ्या देशाचं हिंदुत्व नाही 

द्रमुकच्या खासदारीने गोमूत्रबाजीवर हल्लाबोल केला पण, भाजपाचे हे हिंदुत्व म्हणजे संपूर्ण देशाचे हिंदुत्व नाही. निवडणुकी आल्या की मोदी कपाळाला चंदन आणि भस्म लावून सोवळे पितांबरात एखाद्या मंदिरात जातात त्याची प्रसिद्धी करतात. हे सगळं आता नेहमीचं झालं आहे. गंगाकिनारी अस्पृश्यांचे पाय धुण्याचे सोहळे पार पडतात. पण त्याचवेळी काश्मिरमधील आक्रोश करणारा हिंदू पंडित त्यांचे निर्वासित जीवन त्यांना अस्वस्थ करत नाही, अशी टीका ठाकरे गटाने केली आहे.

Uddhav Thackeray : अजितदादांना कशाचा ताप? सहकाऱ्यांचा की.. उद्धव ठाकरेंचा खोचक टोला

follow us
  • fb
  • instagram
  • youtube