Imtiaz Jaleel : इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा लोकसभेला छत्रपती संभाजीनगरमध्ये पराभव झाल्यानंतर ते आता नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत (Nanded Lok Sabha by-election) नशीब आजमावणार आहेत. त्यांनी विधानसभा तसेच लोकसभेची पोटनिवडणूकही लढवण्याची घोषणा केली आहे. जलील नांदेडमधून लोकसभा पोट निडवणूक लढवणार आहते. तर छत्रपती संभाजीनगरमधून विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवणार आहेत.
तिकीट मागण्याचा सर्वांना अधिकार पण बंडखोरी..,; चंद्रशेखर बावनकुळे स्पष्टच बोलले
नांदेड लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या वसंतराव चव्हाणांनी भाजपचे प्रतापराव चिखलीकर यांचा पराभव करून विजय मिळवला होता. अशोक चव्हाण यांच्यासारखे दिग्गज नेते भाजपसोबत असतांनाही नांदेडमध्ये भाजपचा पराभव झाला होता. दरम्यान, लोकसभा निकालानंतर तीन महिन्यांनी खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाले. त्यामुळे नांदेडमध्ये पोटनिवडणूक होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेडच्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठीही मतदान होणार आहे.
मविआ आणि महायुती वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक पॅकेज, आतील माल एकच…; राजू शेट्टींची टीका
वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना काँग्रेसने उमेदवारी दिल्यानंतर आता इम्तियाज जलील यांनीही शड्डू ठोकलाय.
याबाबत बोलतांना जलील म्हणाले, नांदेडमधून लोकसभा लढवण्याची संधी मिळाली आहे. लोकांमध्ये रोष पाहायला मिळतोय. महाराष्ट्रात मी एकमेव मुस्लिम खासदार होतो. त्याला पाडण्यासाठी या लोकांनी कशी मेहनत घेतली होती, हे सर्वांना माहित आहे. आमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत, त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा आहे. एमआयएम महाराष्ट्रात आल्यानंतर सर्वात जास्त प्रतिसाद आम्हाला नांदेडमध्ये मिळाला. आमच्यावर काही आरोप झाले तरी आम्ही घाबरत नाही. बी टीम आम्हाला म्हणतात, आम्ही हे आरोप गेल्या अनेक वर्षापासून पाहत आहोत. आता आम्ही या आरोपांना काडीचंही महत्त्व देत नाही. आम्हाला संधी आल्यानंतर आम्ही दिवंगत खासदाराबाबत का विचार करू? आम्ही आमच्या पक्षाचा विचार करू, आम्ही कसं निवडणून येऊ शकतो, हा विचार करणार आहोत, असं जलील म्हणाले.
वसंत चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभेच्या जागेसाठी 20 नोव्हेंबरला निवडणूक होणार आहेत. सध्या रवींद्र चव्हाण, इम्तियाज जलील रिंगणात आहेत. मात्र, भाजपने अद्याप येथून कुणाला उमेदवारी दिलेली नाही.