मविआ आणि महायुती वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक पॅकेज, आतील माल एकच…; राजू शेट्टींची टीका

  • Written By: Published:
मविआ आणि महायुती वेगवेगळ्या रंगाचे आकर्षक पॅकेज, आतील माल एकच…; राजू शेट्टींची टीका

Raju Shetti : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुती (Mahayuti) हे दोन वेगवेगळ्या आकर्षक रंगांचे पॅकेज आहेत. मात्र, आतील माल एकच आहे, अशा शब्दात परिवर्तन महाशक्तीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मविआ आणि महायुतीवर टीका केली. खऱ्या अर्थाने फुले-शाहु-आंबेडकरांचे अस्सल विचार घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत, असंही ते म्हणाले.

पवार कसलं परिवर्तन आणणार? खडा सवाल करत तिसऱ्या आघाडीने दंड थोपटले 

परिवर्तन महाशक्ती आघाडीची पुण्यात बैठक संयुक्त पत्रकार परिषद पार पडली.
या परिषदेला प्रहारचे बच्चू कडू, स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांची उपस्थित होते. यावेळी बोलतांना शेट्टी म्हणाले की, परिवर्तन महाशक्तीची आज बैठक झाली. या पहिल्या बैठकीत 150 मतदारसंघ फायनल झाले. लवकरच सर्व जागा निश्चित होतील आणि आम्ही आमचे उमेदवारही जाहीर करणार आहोत. महाराष्ट्रातील सर्व प्रस्थापित घराणे, सातत्याने निवडणुका लढवणारे घराणे आता दोन्ही आघाड्यांमध्ये विखुरलेली आहेत. त्यांच्याशिवायही समाज आहे. राज्यातील 13 कोटी जनतेमध्ये महाराष्ट्राला नेतृत्व देण्याची क्षमता आहे. या प्रस्थापितांनी सर्वसामान्यांना कधीच पुढे येऊ दिले नाही, असे म्हणत राजू शेट्टी यांनी महायुती आणि महाविकास आघाडीवर टीका केली.

चुकून गोळी सुटली अन् पोराच्या पायातून आरपार गेली; तानाजी सावंतांच्या बॉडीगार्डचा हलगर्जीपणा… 

ते म्हणले, आम्ही कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, असंघटित कामगार, दिव्यांग नागरिक या सर्वांना घेऊन पुढे जात आहेत.

यावेळी त्यांनी महाविकास आघाडी आणि महायुतीवर निशाणा साधला. ते म्हणाले की, महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन वेगवेगळ्या आकर्षक रंगांचे पॅकेज आहेत. आतील माल एकच आहे. छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज म्हणजेच फुले-शाहू-आंबेडकर ही यांची विचारधारा घेऊन जाणारी आमची परिवर्तन महाशक्ती आहे. समाजातील प्रत्येक घटकाला आणि वंचितांना न्याय मिळवून देणारी आमची आघाडी आहे. या आघाडीच्या माध्यमातून आ्ही एक सशक्त पर्यात देत आहोत. पहिल्याच प्रयत्नात दीडशे जागांवर एकमत होण्यात आम्हाला यश आले आहे, असं शेट्टी म्हणाले.

बच्चू कडू काय म्हणाले?
भाजप आणि कॉंग्रेस हे धार्मिक लढाई उभे करणारे पक्ष आहेत. मात्र, आम्हाला एका झेंडाच्या रंगाचे नाही तर तिरंगाचे सरकार आम्ही आणू. पवार साहेब म्हणतात परिवर्तन आणू, ते कसले परिवर्तन आणतात, ते सत्तेत असतांना परिवर्तन आणू शकले नाहीत, परिवर्तन आम्ही आणू, असं कडू म्हणाले.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube