मुस्लिम दुबार मतदारांवर पांघरुण घालण्याची भूमिका; शेलारांनी ठाकरे बंधूंवर तोफ डागली…

महाविकास आघाडी अन् मनसेची मुस्लिम दुबार मतदारांवर पांघरुण घालण्याची भूमिका असल्याची टीका मंत्री आशिष शेलार यांनी केलीयं.

Aashish Shelar

Aashish Shelar

Minister Aashish Shelar : राज्यातील मुस्लिम दुबार मतदारांवर पांघरुण घालण्याची भूमिका, महाविकास आघाडी आणि मनसेची असल्याचं म्हणत मंत्री आशिष शेलार (Minister Aashish Shelar ) यांनी ठाकरे बंधूंवर तोफ डागलीयं. मतदार यादीच्या घोळाबाबत महाविकास आघाडीचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मोर्चा काढत निवडणूक आयोगासह भाजपवर गंभीर आरोप केले होते. या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीच्या विजयी आमदारांच्या मतदारसंघातील दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारीच सांगितलीयं.

Video : पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर जखमी

पुढे बोलताना आशिष शेलार म्हणाले, मते मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊ नका. महाविकास आघाडी आणि मनसेला बेनकाब केल्याशिवाय राहणार नाही.
आम्ही निवडणूक आयोगाच्यावतीने उत्तर देत नाही पण निवडणूक आयोग आणि मतदार यादीच्या आड आमच्यावर हल्ला केला तर प्रतिहल्ला सडकून करणार. कर्जत जामखेड मतदारसंघातून आमदार रोहित पवार 1241 मतांनी निवडून आले आहेत. तिथेच 5 हजार दुबार मते आहेत. कर्जत जामखेड मतदारसंघातील दुबार मते दिसले नाहीत का? असा थेट सवाल आशिष शेलार यांनी केलायं.

आहिल्यानगर, मुंबई अन् नाशिकसह ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास धो धो पाऊस; अलर्ट जारी

तसेच नाना पटोले आणि क्षीरसागर यांच्या विजयी मतापेक्षा दुबार मतदार जास्त आहेत. मतदारयादीचा घोळ सांगून विरोधकांकडून फेक नरेटिव्हची बांधणी सुरु आहे.
राज ठाकरे व्होट जिहाद करतात . ठाकरे बंधू मुस्लिम धार्जिन, मुस्लिम दुबार मतदारांची तळी का उचलतायं . तुष्टीकरणाच्या विरोधात आमची स्पष्ट भूमिका आहे.
लातूर धारावी मतदारससंघातही दुबार मतदारांपेक्षा विजयी लीड कमी असून विरोधकांच्या आमदारांच्या मतदारसंघात सर्वाधिक दुबार मतदार आहेत. वर्षा गायकवाडांच्या मतदारसंघात 60 हजार दुबार मतदार आहेत. मुस्लिम दुबार मतदारांवर पांघरुण घालण्याची मविआ मनसेची भूमिका असल्याचं शेलार यांनी स्पष्ट केलंय.

तुमच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना; संजय राऊत यांच्या तब्येतीबाबत पंतप्रधानांचं ट्वीट

दरम्यान, मुंबईत झालेल्या सत्याच्या मोर्चातून महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांसह निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत. मतदार यादीतील दुबार मतदारांची नावे, काहींचे पत्ते यावरुन राज ठाकरेंसह उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सडकून टीका केली होती. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपनेही मूक मोर्चा काढला. त्यानंतर आज मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेतून महाविकास आघाडी आणि मनसेच्या नेत्यांना उत्तर दिलंय.

Exit mobile version