Download App

मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही; चंद्रकांतदादांचा खडसेंवर पलटवार

मी कोल्हापुरचा, मला बदामाची गरज नाही, असा पलटवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यावर केलायं.

Image Credit: Letsupp

Chandrakant Patil News : मी कोल्हापुरचा असून मला बदामाची गरज नाही, असा पलटवार उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे (Rohini Patil) यांच्यावर केलायं. दरम्यान, मुलींच्या मोफत शिक्षणाबाबत केलेल्या घोषणेची आठवण करुन देण्यासाठी चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवणार असल्याचं रोहिणी खडसेंनी स्पष्ट केलं होतं. त्यावर बोलताना चंद्रकात पाटील यांनी पलटवार केलायं. यावेळी बोलताना त्यांनी इतर मुद्द्यांवरही भाष्य केलंय.

सुंदर बाया भोगून घ्या! Kalicharan Maharaj आधी बरळले आता लेखी दिलगिरी, महिला आयोगाचा दणका…

चंद्रकांत पाटील म्हणाले, रोहिणी खडसे कदाचित मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलत असाव्यात. मुक्ताईनगरचे आमदार आणि माझं सारखंच नाव असल्याने नेहमीच गोंधळ होतो. त्यामुळे त्यांना कदाचित त्या चंद्रकात पाटलांना बदाम पाठवयाचे असतील, मला बदामाची आवश्यकता नाही कारण मी कोल्हापुरचा असल्याचं मंत्री चंद्रकातं पाटलांनी स्पष्ट केलंय.

Big News ! मराठवाड्यात खुलं झालं रोजगाराचं द्वार; फडणवीसांनी ट्विट करत दिली मोठी बातमी

राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या मुलींच्या मोफत शिक्षणाबाबतच्या अंमलबजावणीला विलंब होत आहे. त्यावर चंद्रकात पाटील काही दिवसांपूर्वी बोलले होते. ते म्हणाले, लोकसभा आणि मुंबईच्या आचारसंहितेमुळे त्याचा शासन आदेश जाहीर होण्यास विलंब झालायं, लवकरच त्याची कार्यवाही पूर्ण होऊन शासन आदेश लागू होणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी स्पष्ट केलं होतं.

नेमकं काय म्हणाल्या होत्या खडसे?
महायुती सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना त्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून आम्ही त्यांना बदाम पाठवणार आहोत, असं त्या म्हणाल्या होत्या. तसेच राज्यात लवकरच मुलींच्या महाविद्यालयीन प्रवेशाला सुरुवात होणार असून हजारो मुली सरकारच्या या निर्णयाकडे आशेने बघत असल्याचं रोहिणी खडसे म्हणाल्या होत्या.

follow us

वेब स्टोरीज