सुंदर बाया भोगून घ्या! Kalicharan Maharaj आधी बरळले आता लेखी दिलगिरी, महिला आयोगाचा दणका…

सुंदर बाया भोगून घ्या! Kalicharan Maharaj आधी बरळले आता लेखी दिलगिरी, महिला आयोगाचा दणका…

Kalicharan Maharaj : कालीचरण महाराजांना (Kalicharan Maharaj) नाशिकस्थित कार्यक्रमात महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाची राज्य महिला आयोगाकडून (Maharashtra Women Commission) दखल घेण्यात आली. महिला आयोगाने दखल घेताच कालीचरण महाराजांनी लेखी दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी दिलीयं. महिला आयोगाने नाशिक पोलिसांकडून याबाबत नोटीस पाठवून खुलासा करण्याचे निर्देशही दिले होते. यासंदर्भात चाकणकरांनी एक्सवर पोस्ट शेअर करीत माहिती दिलीयं.

रुपाली चाकणकर पोस्टमध्ये म्हणाल्या, नाशिकमधील भद्रकाली परिसरातील कार्यक्रमात कालीचरण महाराजांनी महिलांबद्दल अश्लिल भाषेत वक्तव्य केल्याची, महिलांना केवळ उपभोग्य वस्तू असं उद्देशल्याची घटना समोर आल्यानंतर समाजातून तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. महिलांबाबत अशोभनीय, अवमानजनक वक्तव्य झाल्याने महिला आयोगाने याची स्वाधिकारे दखल घेतली.राज्य महिला आयोगाने नाशिक पोलीसांना नोटीस पाठवून याबाबत खुलासा सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यांनतर नाशिक पोलीसांकडे कालीचरण महाराज यानी आपल्या वक्तव्याबाबत लेखी दिलगिरी व्यक्त केली आहे.सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी महिलांबाबत वक्तव्य करताना काळजी घेतलीच पाहिजे.

राम शिंदे यांच्या पाठपुरवठ्याला यश, कर्जत- जामखेडसाठी 12 कोटी 68 लाखांचा पीकविमा मंजुर

दरम्यान, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने या प्रकरणी पोलीस आयुक्त, नाशिक यांना नियमानुसार चौकशी करून कारवाई करत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

जनतेने नतद्रष्ट सरकारच्या छातीतली हवा काढली; वडेट्टीवारांचा राज्यासह केंद्र सरकारवर घणाघात

काय म्हणाले होते कालीचरण महाराज?
प्रत्येकाचे धर्माची व्याख्या वेगळी आहे. ईश्वराच्या प्राप्तीच सायन्स जीवनात धारण करणे म्हणजे धर्म होय. ईश्वराकडे सर्वाधिक श्रेष्ठ वस्तू मागितली पाहिजे. अनंत सुखानंद म्हणजेच ईश्वर सच्चिदानंद परमात्मा आहे. सगळ्या दुःखांचा पर्मनंट नाश होणार आहे. आपण शरीर नव्हे तर आत्मा आहे.असा आनंद पाहिजे की, ज्याने दुःख झाले नाही पाहिजे. आपण आत्मा आहोत, शरीर नाही. जगातील सर्व सुंदर बाया भोगून घ्या, सर्व भोगून घ्या, चांगल्या फुलाचा वास घ्या. नाकाचा सुगंध घ्या. हा सर्व आनंद संपून जाईल. मात्र ईश्वराचा आनंद संपणार नाही, असं कालीचरण महाराज म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube