विलिनीकरणासाठी घाई करायचे कारण का ? छगन भुजबळांचे शरद पवार गटाच्या नेत्यांना सवाल

Chhagan Bhujbal : मला हे कळत नाही की रोज विलिनीकरणाचे चर्चा का ? विलिनीकरणाचे काय करायचे ते आजही करता येईल नंतरही करता येईल.

Chagan Bhujbal On Ncp Merger

Chagan Bhujbal On Ncp Merger

Chhagan Bhujbal On NCP Merger : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत दररोज वेगवेगळे विधाने दोन्ही पक्षातील नेते करत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांतच शिंदे यांनी विलिनीकरणाबाबत एक लेख लिहिला होता. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकत्र आल्यानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देण्यात येणार होते, असा दावा त्यांनी या लेखात केला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांना प्रत्युत्तर दिले होते. त्यावर शशिकांत शिंदे यांनी आता विलीनीकरणाचा विषय बंद केला असल्याची माहिती दिलीय. तर मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनी विलिनिकरणाबाबत घाई का आहे, असा प्रश्न उपस्थित केलाय.

रोज विलिनीकरणाचे चर्चा का ?-भुजबळ
मला हे कळत नाही की रोज विलिनीकरणाचे चर्चा का ? विलिनीकरणाचे काय करायचे ते आजही करता येईल, एक महिन्याने करता येईल, दोन महिन्याने, तीन महिन्याने करता येईल. विलिनीकरासाठी घाई करायचे कारण काय ? सुनेत्राताई आता उपमुख्यमंत्री आहेत. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आम्ही त्यांची निवड करणार आहोत. त्यानंतर पक्षाचे जे प्रमुख लोक आहेत. सगळे लोक बसून चर्चा करतील. एेवढा मोठा निर्णय हे दोन्ही बाजूच्या लोकांची चर्चा करून होईल. त्याच्याबद्दल एेवढी घाई करायचे कारण नाही, असे म्हणत छगन भुजबळांना विलिनीकरणाच्या चर्चेला ब्रेक लावलाय.

Ind Vs Pak : 10 सेकंद, 70 लाख आणि कोट्यवधी प्रेक्षक, भारत-पाकचा इकॉनॉमिक इम्पॅक्ट


राष्ट्रीय अध्यक्ष निवड करायचाय हाच अजेंडा-भुजबळ

आज ते ठरलं होतं, ते झालंच पाहिजे, हे म्हणणास काहीच अर्थ राहिलेला नाही. नवीन कॅप्टन आलेला आहे. त्यांना बसू द्या, त्यांना काम करू द्या, समजून घेऊ द्या. नंतर बघतील काय करायचे आहे. आज आमच्यासमोर हा विषय खरोखर नाही, असे भुजबळांना सांगितले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष निवड करायचा आमचा प्राथमिक अजेंडा असल्याचे भुजबळांनी सांगितले.

VIDEO : जमीन मोजणीवरून वाद ! राहुल नार्वेकरांना काढता पाय का घ्यावा लागला ?


विलिनीकरणासाठी आमच्यकडून गडबड नाही-शशिकांत शिंदे

शशिकांत शिंदे म्हणाले की, विलिनीकरणासाठी आमच्याकडून गडबड नाही, जे बोललो ते सत्य बोललो. आता आम्ही ठरवलं आहे यावर आता भाष्य करायचं नाही. आम्ही स्पष्ट केलं आहे, निवडणुकीच्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठरणार होते, एकत्र येण्याचे सूत्र कोणते हे नंतर बैठकीत ठरणार होते. त्यांनी एनडीएला विचारावं, त्यांचा पक्षाचा अधिकार आहे, सुनेत्रा वहिनींचा अधिकार आहे. आम्ही आता जर तर चे विचार करणार नाही, त्यांनी पुढे प्रस्ताव दिला तर स्वीकारायचा की नाही ते ठरवू असं माध्यमांशी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले.

Exit mobile version