Sushma Andhare VS Dada Bhuse : पुणे शहरातील ससून रुग्णालयात उपचार घेत असलेला ड्रग्स प्रकरणातील आरोपी ललित अनिल पाटील (वय 34) हा पोलिसांना चकवा देऊन पळून गेला. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली. त्यावरुन आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे(Sushma Andhare) यांनी शिंदे गटाच्या मंत्र्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ललित पाटीलला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी मंत्री दादा भुसे(Dada Bhuse) यांनी रुग्णालयात फोन केला होता, असा आरोप सुषमा अंधारेंनी केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.
Tejaswini Pandit : ‘टोल’वरुन तेजस्विनी आक्रमक होताच, सोशल अकाउंटवर कारवाई; मनसे मदतीला…
सुषमा अंधारे म्हणाल्या, मंत्री दादा भुसे यांचे कॉल रेकॉर्ड चेक करा. चेक केल्यानंतर खरी माहिती समोर येणार आहे. ससून रुग्णालय प्रशासन ललित पाटील याला दाखल करण्यास नकार दिला होता, पण मंत्री दादा भुसे यांनी फोन केल्यानंतर ललितत पाटीलला दाखल करुन उपचार केल्याचाही आरोप त्यांनी केला आहे.
तसेच मी आता थेट माहिती घेत आहे. मी नाव घेताना असं सांगतेय, या प्रकरणात दादा भुसे यांच्या नावाच्या अवती-भोवती संशयाचं धूकं असेल तर त्यांचे कॉल रेकॉर्ड का चेक केलं जात नाही? भुसे यांना प्रश्न का विचारले जाऊ नयेत? गृहखात्याची या प्रकरणाचा खरंच छडा लावण्याची इच्छाशक्ती असेल तर त्यांनी हा विषय स्पष्ट करायला हवा,असं खुलं चॅलेंजच सुषमा अधांरे यांनी गृह खात्याला दिलं आहे.
Rohit Pawar : ‘भाजपाने खोटं बोलणं थांबवाव नाहीतर’.. ‘टोल’वादात रोहित पवारांची उडी
ड्रग्स प्रकरणातील आरोप ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे. या प्रकरणाचा पोलीस कसून तपास करत आहेत. तसेच पोलिसांनी आरोपी पाटीलच्या गळ्याभोवतीचा फास आवळतानाच त्याच्या भावाला बेड्या ठोकल्या आहेत. पण अद्यापही पोलिसांना ललित पाटीलचा ठावठिकाणा लागलेला नाही.अशातच आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मंत्री दादा भुसेंवर गंभीर आरोप केला आहे.
या प्रकरणावर मंत्री दादा भुसे यांनीही थेट भाष्य केलं आहे. ते म्हणाले, नाना पटोले मला ओळखतात.त्यांनी माझं थेट नाव घेतलेलं नाही.सुषमा अंधारे यांनी माझं नाव घेऊन थेट आरोप केला आहे. त्यामुळे जगातील कोणत्याही यंत्रणेच्या माध्यमातून माझी चौकशी करायची असेल तर करा. आंतरराष्ट्रीय पातळीवर कोणतीही चौकशी करा, मी चौकशीला तयार असून माझ्यावरील आरोप चुकीचे असल्याचं स्पष्टीकरण मंत्री दादा भुसे यांनी दिलं आहे.