Download App

‘शिस्त पाळली नाहीतर आम्ही अपात्र करु शकतो’; दीपक केसरकर आपल्या शब्दांवर ठाम

Deepak Kesarkar News : शिक्षकांनी शिस्त पाळली नाहीतर आम्ही अपात्र करु शकतो, असं म्हणत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर(Deepak Kesarkar) आपल्या शब्दांवर ठाम असल्याचं दिसून आले आहेत. दरम्यान, बीडमध्ये आयोजित कार्यक्रमानंतर दीपक केसरकरांनी एका शिक्षिकेला थेट अपात्र करण्याची धमकीचं दिल्याचं समोर आलं होतं. या संवादाचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. त्यावर आज बोलताना दीपक केसरकरांनी आपली भूमिका मांडली आहे. केसरकरांनी मुंबईतून माध्यमांशी संवाद साधला आहे.

Kiran Mane: किरण मानेंची अभिनेत्रीबद्दलची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाले, “इतर कलाकारांपेक्षा सोनालीने…”

दीपक केसरकर म्हणाले, शिस्तभंग कोणी केला तर त्याच्यावर पुढील विचार करुन कारवाई केली पाहिजे. शिक्षकांनी शिस्त पाळणे अपेक्षित आहे. ती महिला अजून शिक्षिका झाली नाही. जे शिस्त पाळत नाही त्यांना आम्ही अपात्र करु शकतो, यामध्ये राजकारणही असू शकतं, असा आरोप दीपक केसरकरांनी केला आहे. दीपक केसरकरांच्या या व्हायरल व्हिडिओनंतर विरोधी नेत्यांकडून टीका-टिप्पणी करण्यात आली. केसरकरांनी जाहीर माफी मागण्याची मागणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावरही केसरकरांनी परखड भाष्य केलंय.

ICC Champions Trophy : आधी ‘आशिया कप’ आता ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’; पाकिस्तानचं यजमानपद पुन्हा संकटात

या प्रकरणी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माझ्यावर टीका केली आहे. सुप्रिया सुळेंना एकच सांगणं आहे की, त्यांनी अगोदर संपूर्ण पत्रकार परिषद पहावी. माझी पत्रकार परिषद सुरु असताना जर असा प्रकार झाला तर ते मला योग्य वाटलं नाही. यामध्ये राजकारण असल्याचंही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

Maratha Rerervation : शिंदे समितीत काहीतरी गडबड; नाना पेटोलेंचा भुजबळांच्या सुरात सूर

मी बीड जिल्ह्यात शासकीय पूजेच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तिथे प्रेस चालू होती. त्यावेळेस एक महिला शिक्षिका प्रेसमध्ये तिथे आली. मला त्यांनी जाब विचारला. जरा थांबलं पाहिजे होतं. शिक्षकांनी मुलांना शिस्त लावणं ही अपेक्षा आहे, पण त्याच बेशिस्तपणे वागल्या आहेत. मी कोणाचाही अपमान केला नाही. ती संपूर्ण प्रेस आपण पाहिली पाहिजे होती. मी शिक्षणमंत्री झालो तेव्हा जाहीर केलं होतं की मी एका वर्षात सगळ्या शिक्षकांचे प्रश्न सोडवले आहेत. ऑनलाईन अर्ज केलाच असेल तर कधी जाहिरात येईल याचं स्पष्टीकरण दिलेलं असंही दीपक केसरकर म्हणाले आहेत.

महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री शिक्षकभरतीबाबत विचारणा करणाऱ्या उमेदवार मुलीला ‘डिसक्वालिफाय’ करण्याची धमकी देतानाचा व्हिडिओ माध्यमातून प्रसिद्ध झाला आहे. हा व्हिडिओ पाहून ‘या मंत्र्यांना नेमकं झालंय तरी काय?’ असा प्रश्न पडतो. एक ज्येष्ठ मंत्री महोदय आजकाल जाहीर सभांतून जनतेला धमकावताना दिसतात. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना त्यांची भूमिका मान्य आहे की या तिघांचीही त्यांना मूक संमती आहे? या मंत्र्यांना नेमकी भीती कशाची आहे? त्यांच्या जे मनात आहे तोच जनतेच्या दरबारात त्यांचा फैसला ठरलेला आहे. तोवर मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या मंत्र्यांना आवरावे, ही विनंती. यासोबतच दीपक केसरकर यांनी तातडीने संबंधित मुलीची जाहीर माफी मागितली पाहिजे असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या.

Tags

follow us