मी शिर्डीत..म्हणूनच कोल्हापुरचा पूर टळला, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा अजब दावा…

मी शिर्डीत..म्हणूनच कोल्हापुरचा पूर टळला, शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा अजब दावा…

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या वेगळ्याचं दाव्यामुळे ते चांगलेच चर्चेत आले आहेत. मी शिर्डीत असल्यानेच कोल्हापुरला पूर टळला, असा अजब दावा शिक्षणमंत्री केसरकर यांनी केला आहे. दरम्यान, केसरकर शिर्डीत साईबाबांचरणी लीन झाले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. त्यांच्या या अजब दाव्याने त्यांच्यावर टीका केली जात आहे.

आयआयटी बॉम्बेच्या निर्णयाने खळबळ; मांसाहारी विद्यार्थ्यांना कॅन्टीनमध्ये प्रवेश नाकारला

पुढे बोलताना ते म्हणाले, अंधश्रद्धा म्हणा श्रद्धा किंवा काहीही म्हणा, पण पूर परिस्थिती असताना मी शिर्डीत होतो. त्याचंवेळी कोल्हापुरात राधानगरी धरणातून पाणी सोडण्यात आलं होतं. धरणातून पाणी सोडल्यानंतर पाणी पातळीत 5 फुटाने वाढ होते हे सर्वांना माहितीच आहे. पण यंदा मी योगायोगाने शिर्डीत होतो, त्यामुळे एका फुटानेही पातळी वाढली नसल्याचं केसरकर म्हणाले आहेत.

मला त्याने डेट करण्याची विनवणी केली, कंगना रनौतने घेतले ‘या’ अभिनेत्याचे नाव

तसेच कोल्हपुरात पाणी पातळीत वाढ झालेली नाही ही वस्तुस्थिती असून तुम्ही तपासून पाहु शकता, मी शिर्डीत ठाण मांडून बसलो होतो. त्यावेळी मी देवाकडे हे संकट टळण्यासाठी प्रार्थना करीत होतो. प्रार्थनेत ताकद असते. तुम्ही पाटबंधारे विभागाकडे चौकशी केली तर 5-6 फुट पाण्यामुळे अनेक गावं पाण्याखाली गेली असती ही माहिती मिळेल, पण निसर्गात देव आहे. प्रार्थनेत ताकद आहे, अध्यात्म महत्वाचं असल्याचंही केसरकरांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, केसरकरांच्या या दाव्यानंतर त्यांना विरोधकांकडून ट्रोल केलं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली असून असा मूर्खपणा केवळ… आपल्या प्रार्थनेमुळे पूर आला नाही, असे सांगण्याचा मूर्खपणा केवळ आणि केवळ महाराष्ट्रातील मंत्री करू शकतो, इतर कुणी नाही, अशी टीका राऊतांनी केलीयं.

तसेच सत्ताधारी सरकारमध्ये असलेल्या नेत्यांकडूनही केसरकरांवर उपहासात्मक टीका करण्यात आली असून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी उपहासात्मक टीका केलीयं. आमची धरणे पूर्ण भरून द्या असं भुजबळांनी म्हटलं आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube