Download App

‘उद्धव ठाकरेंचं नाव घेतल्यावर मला जेवण जात नाही’; नारायण राणेंची कडू टीका

Narayan Rane Vs Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं(Udhav Thackeray) नाव घेतल्यावर मला जेवत नाही, या कडू शब्दांत केंद्रीय मंत्री नारायण राणे(Narayan Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Udhavh Thackeray) यांच्यावर टीका केली आहे. मंत्री नारायण राणे सिंधुदुर्ग दौऱ्यावर होते. यावेळी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांवरुन उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं आहे.

पीक विम्याची भरपाई आठ दिवसांत जमा करा, अन्यथा कारवाईची तयारी ठेवा; कृषिमंत्र्याचा इशारा

मंत्री राणे पुढे म्हणाले, ठाकरे आताच्या सरकारला अनेक गोष्टींबाबत विचारणा करतात, पण त्यांनी त्यांच्या अडीच वर्षाच्या काळात काय काम केलं ते सांगावं. ठाकरे यांचं नाव घेतल्यावर मला जेवण जात नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली आहे.

भाजपने गमावला आणखी एक मित्र; मोदी-शाहंची ‘दक्षिण दिग्विजय’ मोहीम स्वप्नवतच राहणार?

तसेच अडीच वर्षात यांनी काय पराक्रम करुन दाखवलाय? किती पर कॅपिटल उत्पन्न वाढवले? जीडीपी किती वाढवली? रोजगार निर्मिती किती केली? गरिबीचे प्रमाण किती कमी केले? कुपोषितपणा किती कमी केला? असले विषय उद्धव ठाकरे यांना कळणार देखील नाहीत. त्यांना काहीही माहिती नसते. खोके आणि ठोके याच्या पलीकडे त्यांना जाता येत नाही. ठाकरे यांचं नाव घेतल्यावर मला जेवण सुद्धा जात नसल्याचं नारायण राणे म्हणाले आहेत.

चंद्रकांतदादा दिवसेंदिवस कोल्हापूरपासून लांबच! व्हाया पुणे आता अमरावतीची जबाबदारी

दरम्यान, राज्यात संत्तासंघर्षानंतर शिवसेनेत दोन गट पडले. एक म्हणजे उद्धव ठाकरे गट तर दुसरा एकनाथ शिंदे गट. शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्तास्थापन केली. त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून उद्धव ठाकरे यांच्यासह नेत्यांवर टीकेची झोड उठवली जात आहे.

राणे आणि ठाकरे यांचा जुना वाद सर्वांनाच ज्ञात आहे. ठाकरे आणि राणे यांच्याकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप टीका-टीप्पणी सुरुच असते, अशातच आता राणे यांनी केलेल्या टीकेवर उद्धव ठाकरे हे पलटवार करणार पण ते काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Tags

follow us