चंद्रकांतदादा दिवसेंदिवस कोल्हापूरपासून लांबच! व्हाया पुणे आता अमरावतीची जबाबदारी

चंद्रकांतदादा दिवसेंदिवस कोल्हापूरपासून लांबच! व्हाया पुणे आता अमरावतीची जबाबदारी

मुंबई : अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची पुण्याच्या पालकमंत्रीपदी वर्णी लागली आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याकडे पुण्याऐवजी आता सोलापूर आणि अमरावतीची जबाबदारी देण्यात आली आहे. आज (4 ऑक्टोबर) जाहीर करण्यात आलेल्या फेररचनेत 12 जिल्ह्यांना नवे पालकमंत्री मिळाले आहेत. यात अजित पवार यांच्या गटातील 9 पैकी 7 मंत्र्यांकडे जबाबदारी देण्यात आली आहे. (Minister Chandrakant Patil is the new Guardian Minister of Solapur and Amravati district)

दरम्यान, अजितदादांना पुन्हा पुण्याचे पालकमंत्रीपद मिळाल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. पण त्याचवेळी चंद्रकांत पाटील यांची पालकमंत्रीपदावरुन उचलबांगडी झाल्याने भाजपच्या गोटात निराशेचे वातावरण आहे. शिवाय यामुळे आधीच कोल्हापूरपासून दुरावलेले चंद्रकांत पाटील आता पुण्यापासूनही दुरावले जाण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे ना कोल्हापूर, ना पुणे अशी काहीशी अवस्था चंद्रकांत पाटील यांची झाली आहे.

कोल्हापूर : उत्तरेवर भाजपचा दावा, राजेश क्षीरसागरांची दक्षिणेत चाचपणी; दोन्ही घरचा पाहुणा उपाशी राहणार?

चंद्रकांतदादा दिवसेंदिवस कोल्हापूरपासूनच लांबच :

मुळचे कोल्हापूरचे असलेल्या चंद्रकांत दादांना 2019 मध्ये विधानपरिषदेवरुन विधानसभेत पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार त्यांना भाजपसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या पुण्यातील कोथरुड मतदारसंघातून तिकीट दिले आणि तिथून ते निवडूनही आले. पण त्यानंतर कोल्हापूरमधून निवडणूक न लढविल्याने त्यांच्यावर अनेकदा टीका झाली. ते कोल्हापूरपासून स्वतःला लांब ठेवतात, कोल्हापूरमधून पराभावाची भीती होती म्हणून त्यांनी पुण्याची निवड केली, असे म्हणत त्यांना ट्रोल करण्यात आले.

यावर एकदा बोलताना चंद्रकांत पाटलांनी “कोल्हापूरमधून कोणत्याही मतदारसंघातून एकाने राजीनामा द्यावा आणि तिथे पोटनिवडणूक लावावी”, असे आव्हान दिले होते. त्यानंतर दोन वर्षांत कोल्हापूर उत्तरमध्ये चंद्रकांत जाधव यांच्या निधनाने पोटनिवडणूक जाहीर झाली. तेव्हा तिथून चंद्रकांत पाटील निवडणूक लढविणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र त्यावेळी भाजपने सत्यजित कदम यांना तिकीट दिले. त्यानंतरही पाटील यांच्यावर टीका झाली.

Letsupp Special : राजकीय सिंहासनापासून कोल्हापूरचे राजे लांबच…

आता पुन्हा त्यांना कोल्हापूरमध्ये पाठविण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु होते. मात्र हे कोल्हापूरचे पालकमंत्रीपद हसन मुश्रीफ यांच्याकडे गेल्याने हे प्रयत्न फसले आहेत. शिवाय पुण्याचे पालकमंत्रीपद अजितदादांकडे गेल्याने ते पुण्यापासूनही दुरावले जाण्याची चिन्हे आहेत. आता चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि थेट विदर्भातील अमरावती जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube