Download App

मराठा आंदोलकांनी अडवली पवारांची गाडी, मंत्री विखे म्हणाले, ‘भूमिका स्पष्ट करा, किता काळ फसवणार?’

शरद पवारांची भूमिका दुटप्पी आहे. लोकांना किती काळ फसणवार आहात? शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे.

  • Written By: Last Updated:

Radhakrishna Vikhe Patil : गेल्या काही दिवसांपासून राज्यातराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा पेटला आहे. अशातच मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून मराठा आंदोलकांनी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची गाडी अडवली. पवार हे बार्शी दौऱ्यावर असतांना त्यांची गाडी आंदोलकांनी अडवली. यावरून आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

विरोधक विरोध करतायंत पण, लाडक्या बहिणींना पैसे मिळणारच; आदिती तटकरेंनी सुनावलं 

साकुरी-राहता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य आवारातील विविध विकासकामांचे भूमिपूजन अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. मराठा आंदोलकांनी शरद पवारांची गाडी अडवली. याबाबत विखे पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, शरद पवार चार वेळा मुख्यमंत्री राहिले आहेत. मात्र, ते आरक्षणाबद्दल का बोलत नाहीत? शरद पवारांची भूमिका दुटप्पी आहे. लोकांना किती काळ फसवणार आहात? शरद पवार यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीच पाहिजे. पवारांकडून सरकारला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरू आहे, अशी टीका विखे पाटलांनी केली.

मारुतीच्या कार्सवर बंपर डिस्काउंट, Wagon R खरेदीवर होणार 67 हजारांची बचत 

राज ठाकरे यांना आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेवरून बीडमध्ये त्यांच्या ताफ्यावर सुपारी फेकून निषेध व्यक्त करण्यात आला. यात ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी असल्याचा दावा राज ठाकरेंनी केला. त्यानंतर काल ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या ) ताफ्यावर नारळ, बांगड्या आणि शेण फेकून मनसैनिकांनी संताप व्यक्त केला. यावरही विखेंनी भाष्य केलं. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका राज्याच्या भविष्यासाठी आहे. उद्धव ठाकरे फक्त फेसबुक मुख्यमंत्री होते. त्यांनी राज्यातील जनता वाऱ्यावर सोडली होती. हे महाराष्ट्र किती हे सहन करणार आहे. राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका योग्य असल्याचे विखे पाटील म्हणाले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास पहायचा आहे. तुम्ही कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली. रोहित पवारांच्या या टीकेलाही विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, हा प्रश्न रोहित पवार यांनी शरद पवारांना विचारावा, त्यांनी संपूर्ण हयातीत किती कुटुंब फोडली, किती कुटुंब उध्वस्त केली, किती कुटुंबांना राजकारणातून संपवलं? हा प्रश्न रोहित पवारांनी त्यांच्या आजोबांना विचारावा, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.

follow us