Ramdas Athavale : देशात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु असून महायुतीतील घटक पक्ष आरपीआयचे (RPI) अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athavale) यांच्याकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला आहे. मी शरद पवारांकडे गेलो असतो तर मला जागा मिळाली असती, मी प्रमाणिक असल्याचं म्हणत रामदास आठवलेंनी नाराजी व्यक्त केली आहे.
ट्रान्सजेंडर समुदायासाठी फूड ट्रकच्या उद्घाटनाला पोहोचला आयुष्मान, व्हिडीओ पाहून चाहते म्हणाले…
महायुतीमध्ये सामिल असलेल्या अजित पवार गटातील दोन आणि शिंदे गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आले आहेत. लोकसभेच्या जागावाटपाबाबत महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांमध्ये धुमश्चक्री सुरु असल्याची चर्चा आहे. अजित पवार गटाकडून सात जागांवर दावा ठोकण्यात आला तर शिंदे गटाकडून लोकसभेसाठी नऊ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
महायुतीकडून अजित पवार गटाने सात तर शिंदे गटाने 9 जागांवर आधीच उमेदवार घोषित केले आहेत. त्यात आता रामदास आठवलेंकडून शिर्डी लोकसभेच्या जागेची सातत्याने मागणी केली जात होती. आरपीआय पक्षाला महायुतीकडून दोन जागा मिळाव्यात यामध्ये सोलापूर आणि शिर्डीची जागा देण्यात यावी, अशी गळ आठवलेंनी घातली होती. मात्र, महायुतीकडून रामदास आठवलेंना अद्याप एकही जागा देण्यात आलेली नाही. त्यामुळे आठवले नाराज असल्याचं दिसून येत आहे.
‘गोविंदा तुमच्यापेक्षा चांगला नट, टीका करणाऱ्यांना सद्बुद्धी…; CM शिंदेंचा जयंत पाटलांना खोचक टोला
नाराजीवर रामदास आठवले म्हणाले,
लोकसभेची जागा नाही तर केंद्रात कॅबिनेट, राज्यात मंत्रिपद आणि विधानसभेत जागा, महामंडळे आणि इतर सत्तापदांमध्ये आरपीआयला वाटा मिळावा. आम्ही एनडीए सोबतच आहोत, ईशान्य मुंबईची जागा जिंकू शकलो असतो. महादेव जानकर शरद पवारांना भेटून आले आहेत. मी पवारांकडे गेलो असतो तर मला जागा मिळाली असती, मी प्रामाणिक आहे. जानकर तिकडं जाऊ नयेत म्हणून देवेंद्र फडणवीसांनी त्यांना जागा दिली आहे. देवेंद्र फडणवीस हुशार राजकारणी आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला दिलेला ते पाळणार असल्याचंही रामदास आठवलेंनी स्पष्ट केलं आहे.
मविआकडून प्रकाश आंबेडकरांचा अपमान…
भाजपविरोधात अनेक आघाड्या आहेत, त्यांना पिछाडीवर टाकण्याची आमच्यात ताकद असून प्रकाश आंबेडकर यांचा महाविकास आघाडीने अपमान केला आहे, दिलेला शब्द पाळला नाही, शिवसेनेने जागा दिल्या नाहीत. आंबेडकरांनी स्वबळावर लढावं, ते भाजपविरोधात लढले, तरी मी भाजपसोबत असल्याने दलित, बौद्ध मतं महायुतीलाच मिळतील, असा विश्वास आठवलेंनी व्यक्त केलायं.