Download App

‘उद्धव ठाकरेंना सांगताही येईना अन् सहनही होईना’; देसाईंची जळजळीत टीका

Shambhuraj Desai On Udhav Thackeray : उद्धव ठाकरेंना सांगताही येईना आणि सहन होईना, अशीच अवस्था झाली असल्याची जळजळीत टीका राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी केली आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर भाष्य करीत उद्धव ठाकरे( Udhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या परराज्यातील दौऱ्यावर बोट ठेवत टीका केली. उद्धव ठाकरेंच्या या टीकेनंतर शंभूराज देसाई यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्या अवस्थेवरच भाष्य करीत प्रत्युत्तर दिलं आहे.

Chhagan Bhujbal : ‘नवी वर्णव्यवस्था येतेय, लायकी काढली जाते’; भुजबळांचा मनोज जरांगेंवर निशाणा

शंभूराज देसाई म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारा आत्तापर्यंतचा एकच मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहिलं जातं. तत्कालीन सरकारच्या काळात कोकणात जेव्हा नैसर्गिक आपत्तीचं संकट येत होतं तेव्हा तत्कालीन सरकारचे मंत्रीच शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन पाहणी करत होते. आत्ताही सरकारचे मंत्री पाहणी करती आहेत, चार भींतीच्या आत बसायचं, माध्यमांसमोर बसायचं, चार-पाच जिल्ह्यांचा दौरा एकाच दिवसांत करुन प्रत्यक्षात मात्र काहीही करायचं नसल्याची टीका शंभूराज देसाईंनी केली आहे.

ICC Champions Trophy : आधी ‘आशिया कप’ आता ‘चॅम्पियन्स ट्रॉफी’; पाकिस्तानचं यजमानपद पुन्हा संकटात

तसेच सध्या उद्धव ठाकरे यांची अवस्था सांगताही येत नाही आणि सहन होत नाही अशीच काहीशी झाली असल्याचंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत. तत्कालीन सरकारमध्ये स्वत; उद्धव ठाकरे कधीच पाहणी करण्यासाठी गेलेले नाहीत, स्वत:चं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून, असं उद्धव करत असल्याचं टीकास्त्र शंभूराज देसाईंनी सोडलं आहे.

तसेच मी माध्यमांवर ऐकलंय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत आहेत, जर उद्धव ठाकरे अशा पद्धतीने मुख्यमंत्री शिंदेंवर टीका करत असतील तर आम्हालासुद्धा नाईलाजास्तव बोलावं लागणार हे तुम्हाला सांगावं लागत, असल्याचंही देसाईंनी स्पष्ट केलं आहे.

राज्यात अवकाळी पावसाने थैमान घातलं. यामुळे शेतकऱ्यांची उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने बळीराजा हवालदील झाला. याप्रसंगी शेतकऱ्यांच्या बांधावर जायचं सोडून स्वत:ला गरीब शेतकऱ्यांचा मुलगा म्हणणारे मुख्यमंत्री तेलंगणा राज्यात निवडणुकांच्या प्रचाराला गेले. शेतकऱ्यांवर आस्मानी संकट ओढावलेले असताना आपले राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जायला लाज कशी नाही वाटत? उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवरही टीकेची तोफ डागली.

यावेळी ठाकरेंनी मुख्य़मंत्र्यांसह उपमुख्यमंत्र्यांचा एक फुल दोन हाफ असा उल्लेख केला. मधल्या काळात दुसरे हाफ छत्तीसगढला प्रचाराला गेले होते. तर, दुसऱ्या हाफला डेंग्यू झाला होता, ते कुठे आहेत त्याबद्दल माहिती नाही. त्यामुळे राज्याचा मायबाप नेमका कोण?, असा प्रश्न निर्माण झाला असल्याचंही उद्धव ठाकरे म्हणाले होते.

Tags

follow us