Download App

दोन वर्षात महाराष्ट्र एफडीआयमध्ये अव्वल, ठाकरेंच्या काळात अर्थव्यवस्था उद्धवस्त…; उदय सामंतांची टीका

तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. ती पूर्वपदावर आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, फडणवीस यांनी केलं. - सामंत

Uday Samant : सरकारने अर्थसंकल्पात मोठमोठ्या घोषणा केल्याने विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. अर्थसंकल्प केवळ घोषणांचा पाऊस असल्याची टीका महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) नेत्यांनी केली होती. दरम्यान, सरकावर होत असलेल्या टीकेला आता मंत्री उदय सामं (Uday Samant) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. ठाकरेंच्या काळात राज्याची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. ती पूर्वपदावर आणण्याचं काम आमच्या सरकारने केल्याचं सामंत म्हणाले.

जातीनिहाय जनगणना करा अन् मराठा समाजाला आरक्षण द्या, अमोल कोल्हेंची संसदेत मागणी 

उदय सामंत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी सरकावर सडकून टीका केली. ते म्हणाले, तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्राची अर्थव्यवस्था डळमळीत झाली होती. ती पूर्वपदावर आणण्याचं काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी केलं. FDI मध्ये महाराष्ट्र दोन वर्षात अव्वल स्थानावर पोहोचला आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली 2022-23 मध्ये राज्याचा जीडीपी 9.4 टक्क्यांनी वाढला आहे. एफडीआयचा आलेख बघितला तर गेली दोन वर्षे सातत्याने एफडीआयमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे, असं सामंत म्हणाले.

मुंबई शिक्षक- पदवीधर मतदारसंघात ठाकरेंचा डंका! कोकण मात्र भाजपकडे; पहा संपूर्ण निकाल 

पुढं बोलताना ते म्हणाले, वारकरी दिंड्यांना शासनाने 20 हजार रुपये अनुदान दिले. पण काही जणांना पोटदुखी झाली. या घोषणेला विरोध करताना वारकरी सांप्रदायाचा अपमान केला. वारकरी भवन बांधण्याची भीष्म प्रतिज्ञा मविआ सरकारच्या काही लोकांनी केली होती. त्याचं काय झालं? असा सवाल सामंत यांनी केला.

रत्नागिरी जिल्ह्याचे आमदार रिफायनरीला पाठिंबा देतात तर माजी खासदार विरोध करतात. ठाकरे गटाने यावर आपली भूमिका स्पष्ट करावी, असंही सामंत म्हणाले.

 

विरोधकांनी भान ठेवायला हवं…
उद्योग खात्यावर विरोधकांकडून टीका केली जाते. पण, दावोस येथे झालेल्या गुंतवणूक परिषदेत महाराष्ट्रात तीन वर्षांत किती एफडीआय, किती करार झाले आणि किती अंमलबजावणी झाली? याची श्वेतपत्रिका सरकार प्रसिद्ध करणार आहे. खोट्या नेरेटीव्हने गुंतवणूकदार, उद्योजकांमध्ये संभ्रम तयार होता. त्याचा परिणाम राज्यातील गुंतवणूकीवर होता, त्यामुळं उद्योग विभागावर टीका करताना विरोधकांनी भाव ठेवायला हवं, असं सामंत म्हणाले.

follow us

वेब स्टोरीज