मुंबई शिक्षक- पदवीधर मतदारसंघात ठाकरेंचा डंका! कोकण मात्र भाजपकडे; पहा संपूर्ण निकाल

मुंबई शिक्षक- पदवीधर मतदारसंघात ठाकरेंचा डंका! कोकण मात्र भाजपकडे; पहा संपूर्ण निकाल

MLC Election Result: लोकसभा निवडणुकीनंतर संपूर्ण राज्याचे लक्ष विधानपरिषदेसाठी होत असलेल्या निवडणुकांवर लागला आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, मुंबई शिक्षक आणि नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघात 26 जून रोजी निवडणूक पार पडली होती तर आज या निवडणुकीचे निकाल समोर येत आहे. आतापर्यंत चार पैकी तीन मतदारसंघाचे निकाल जाहीर करण्यात आले आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांनी भाजप उमेदवार किरण रवींद्र शेलार यांचा तब्बल 44 हजार 784 मतांनी पराभव केला आहे.

याबाबत माहिती देताना मुंबई पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पी.वेलरासू (P.Velrasu) म्हणाले की, या निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आगरी कोळी संस्कृती भवन येथे एकूण 28 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत 67 हजार 644 मतदारांनी मतदान केले त्यापैकी 64 हजार 222 मते वैध तर 3 हजार 422 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 32 हजार 112 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी पी.वेलरासू यांनी दिली.

तर दुसरीकडे कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार निरंजन डावखरे यांनी पुन्हा एकदा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे. तर मुंबई शिक्षक पदवीधर मतदारसंघात ठाकरे गटाचे उमेदवार ज. मो. अभ्यंकर यांनी भाजप उमेदवार शिवनाथ दराडे यांचा पराभव केला असल्याची माहिती समोर आली आहे. याच बरोबर नाशिक शिक्षक मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप गुळवे यांचाही विजय जवळपास निश्चित झाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

चार पैकी तीन जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना या निवडणुकीत विजय मिळण्याची शक्यता असल्याने लोकसभेनंतर पुन्हा एकदा महायुतीला मोठा फटका बसल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघातून विजय मिळवल्यानंतर अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत आपली पहिली प्रतिकिया दिली आहे. मी या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून विजय झालोय. माझ्या विजयासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवा नेते आदित्य ठाकरे तसेच असंख्य शिवसैनिकांनी मी निवडून यावं म्हणून अहोरात्र प्रयत्न केले असं अनिल परब म्हणाले.

शेतकऱ्यांनो, गुड न्यूज! जुलैमध्ये धो धो पाऊस, जाणून घ्या ताजे अपडेट

तसेच आम्ही नेहमी घोषणा देतो, मुंबई आहे आमच्या साहेबांची, नाही कुणाच्या बापाची. ही घोषणा आज आम्ही सत्य करून दाखवली. मुंबईत फक्त शिवसेनाच आहे ती सुद्धा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेही अनिल परब या पत्रकार परिषदेमध्ये म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज