Aaditya Thackeray On Eknath Shinde: शिवतीर्थावरील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात पहिल्यांदाच आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी जोरदार भाषण केले. आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात राज्य सरकार, केंद्र सरकारवर आरोप केले आहेत. तर महिन्याभरात आपले सरकार येईल, तेव्हा हे मंत्री घरी बसतील किंवा जेलमध्ये असतील, असा इशारा त्यांनी दिलाय.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या भाषणात आजोबा बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली. आजोबा बाळासाहेब ठाकरे यांनी माझ्या हातात तलवार दिली होती. आजच्या दिवशी मी भाषण करित आहे. आजोबा, पणजोबा यांचे मला आशीर्वाद आहेत. ही सर्वात मोठी लढाई आहे. राज्यात लोकसभेला परिवर्तन झाले आहे. 2024 ची विधानसभा निवडणूक कधी लागणार आहे, याकडे लक्ष आहे. आताचे सरकार शेवटच्या मिनिटाला हजारो कॅबिनेटचे निर्णय घेत आहे. महामंडळे बनवत आहे. पण आचारसंहिता लागणार नाही, असे मला एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. जोपर्यंत अदानी यांच्यासंबंधात जीआर निघत नाहीत, तोपर्यंत निवडणूक लागणार आहे, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केलाय.
आपली खरी शिवसेना आहे. आपल्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे नाव जोडलेले आहे. राज्यात मुंबई, महाराष्ट्राची लूट सुरू आहे. मिंदा सरकार स्वतःसाठी खोके भरत आहे. पण आता हा महाराष्ट्र झुकणार नाही आणि लुटला ही जाणार नाही. मुंबईत दोन मोठे रस्ते घोटाळे झाले आहेत. सहा हजार कोटींचा घोटाळा आहेत. त्यातील एक हजार कोटी रुपये वाचविले आहे. पण आता हे पैसे काढण्यासाठी आयुक्तांनी सही करू नका, याद राखा, असा इशारा देताना आदित्य ठाकरे यांनी आत राहायचे की बाहेर राहायचे ते ठरवा असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवरायांच्या पुतळ्यामध्ये घोटाळा केला आहे. तर दुसरे मंत्री (दीपक केसरकर) चष्मा खाली करून बोलतात, आता मोठे काम करू पण. पण तुम्हाला शिक्षा होणार आहे. तुम्हाला, मंत्र्यांना घरी आणि जेलमध्ये बसविणार आहे, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिलाय.