Aaditya Thackeray News : मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा प्रलंबित आहे. अशातच महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमेवर असलेलं बेळगाव कारवार केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीयं. यासंदर्भातील पत्रच आदित्य ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलंय.
बेळगावात होत असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महाअधिवेशनाला कर्नाटक सरकारने परवानगी तर नाकारलीच, त्यावर बेळगावात संचारबंदीही लागू केली. सीमाही बंद केल्या जात आहेत. मराठी माणसांवरच्या ह्या अन्यायाचा तीव्र निषेध!
बेळगाव हा मराठी अस्मितेचा अविभाज्य भाग आहे आणि राहणारच!
माझं…
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 9, 2024
या मागणीबाबत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, बेळगावच्या मराठी माणसांवर होणारा अन्याय, अत्याचार आम्ही सहन करु शकत नाही. केंद्र सरकारने बेळगाव परिसरात अधिकचा निधी देऊन विकास करण्याचं आश्वासन दिलं होत पण बेळगावला केंद्रशासित प्रदेश कधी करणार? याचं उत्तर सरकारने द्यावं कोणाचंही सरकार असलं तरीही आम्ही अन्याय सहन करणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी ठणकावून सांगितलंय.
..मी तेव्हाच म्हटलं होत अगोदर निवडून तर या; राधाकृष्ण विखे पाटलांची बाळासाहेब थोरातांवर टीका
तसेच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रकरणाचा न्यायालयीने निकाल लागेपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश जाहीर करावा ही आमची कायम भूमिका आहे. मराठी माणूस राज्य सरकारचा लाडका आहे की नाही, हे सरकारने दाखवून द्यावं. मराठी माणसांवरील अन्याय दूर करण्याबाबतची भूमिका सरकारने मांडावी, लाडकी बहिण आणि इतर खोटे वादे सरकारकडून केले जात असून राज्यातील मंत्रिमंडळ भ्रष्ट आहे, त्यामुळे एसीबी बंद होईल, असा दावा आदित्य ठाकरेंनी केलायं.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद नेमका काय?
महाराष्ट्र सरकारकडून कर्नाटकातील मराठी बहुल भागातील गावांवर दावा करण्यात आलायं. या सीमाभागातील बेळगाव, धारवाडसह इतर शहरांत मराठी बहुल माणसं मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने या गावांचा महाराष्ट्रात समावेश करण्यात यावा, अशी मागणी केलीयं. या मागणीसाठी अनेकदा आंदोलनेही झाली आहेत.