Download App

प्रकाश आंबेडकरांनी आणि अजितदादांनी एकत्र यावे, मी मध्यस्थी करतो; मिटकरींची पुन्हा एकदा साद

प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे. त्यांच्या काही अटी असीतल तर त्यासाठी आपण मध्यस्थी करण्याचे काम करू. - अमोल मिटकरी

  • Written By: Last Updated:

Amol Mitkari : आगामी विधानसभा निवडणुकीची (Vidhansabha Election) आचारसंहिता काही दिवसांत लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आहे. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादीचे अजित पवार (Ajit Pawar) यांनी राजकीयदृष्ट्या एकत्र यावे, अशी साद आमदार अमोल मिटकरींनी (Amol Mitkari) घातली. मिटकरींच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत.

Ratan Tata Biopic: रतन टाटा यांच्या जीवनावर बनणार चित्रपट, 190 हून अधिक देशांमध्ये होणार प्रदर्शित 

अमोल मिटकरी यांनी यापूर्वीही अजित पवार आणि प्रकाश आंबेडकर यांना एकत्र येण्याचे आवाहन केलं होतं. मात्र त्याला दोन्ही नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नव्हता. दरम्यान, आज मिटकरी म्हणाले, प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रक्ताचे तसेच वैचारिक वारसदार आहेत, तर अजितदादा हे शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांचे वैचारिक वारसदार आहेत. मध्यंतरी या दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्यासाठी आपण प्रयत्न केले होते. मात्र, दोघांकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने ते प्रयत्न थांबवले होते. आता आपण शेवटच्या श्वासापर्यंत हे दोन्हे नेते एत्रक आणण्यासाठी प्रयत्न सोडणार नाही, असं मिटकरी म्हणाले.

पाकिस्तनाला धक्का, इंग्लंडकडून पराभव अन् WTC पॉइंट टेबलमध्ये मोठा फेरबदल 

आंबेडकर सोबत आले तर विशेष आनंद
मिटकरी म्हणाले की, प्रकाश आंबेडकरांनी आमच्यासोबत यावे. त्यांच्या काही अटी असीतल तर त्यासाठी आपण मध्यस्थी करण्याचे काम करू. आगामी निवडणुकीत शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या वारसदारांनी एकत्र यावं, अशी भावनाही मिटकरींनी व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर राष्ट्रवादीसोबत आल्यास आम्हाला विशेष आनंद होईल, असेही ते म्हणाले.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार उठून गेले. त्यामुळं अजित पवार महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे. या चर्चांवरही मिटकरींनी भाष्य केलं. अजित पवार महायुतीत नाराज नाहीत. महाविकास आघाडी आणि शरद पवार गटाकडून जाणीवपूर्वक अशा बातम्या पेरल्या जात आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये खटका उडवल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. अजित पवार आणि महायुतीला जाणीवरपूर्वक बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, अशी टीका मिटकरींनी केली.

 

follow us