Amol Mitkari On Yugendra Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार (Sharad Pawar) आणि अजित पवार (Ajit Pawar) असे दोन गट पडले आहेत. अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांचे पुत्र युगेंद्र पवार यांनी आज शरद पवार गटाच्या बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाला अचानक भेट दिली. त्यामुळं युगेंद्र पवार (Yugendra Pawar) राजकारणात येणार असल्याची चर्चा सुरू झाली. त्यांनी अजित पवारांऐवजी शरद पवारांना साथ द्यायचं ठरवलं. दरम्यान, यावर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अशोक चव्हाण, नारायण राणे अन् SM कृष्णा.. माजी मुख्यमंत्र्यांनीही सोडला काँग्रेसचा ‘हात’
आज अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. युगेंद्र पवार राजकारणात येणार याविषयी विचारले असता मिटकरी म्हणाले, युगेंद्र पवार यांचं नाव आज महाराष्ट्राने पहिल्यांदा ऐकलं. ते कुणाचे पुत्र आहेत, हे महाराष्ट्राला पहिल्यांदा कळलं. युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचा सुपुत्र आहेत. युगेंद्र यांची आम्हाला काहीही अडचण नाही. मात्र, तिकडच्या गटात अजित दादा होण्याचा जो नेता, संघर्षयोध्दा प्रयत्न करतोय, त्याला मात्र फार मोठा फरक पडेल. आपण अजितदादा होऊ, असे वाटणाऱ्यांना रोखण्यासाठी शरद पवारांनी युगेंद्र पवार यांना पुढे केले आहे, असं मिटकरी म्हणाले.
Nora Fatehi : नोरा फतेहीच्या बोल्ड लुकनं चाहते घायाळ
मिटकरी म्हणाले की, बारामती लोकसभेमध्ये सुनेत्रा पवार यांना प्रचार प्रसार होतोय. तिथं सुप्रिया ताईंनाही नेतृत्व केलं आहे. मात्र, अजित पवारांच्या नेतृत्वातील काम करणाऱ्या उमेदवारांना बारामतीकर पाठींबा देतील. बारामतीकर सुज्ञ आहेत. सुनेज्ञा पवारांनी बारामतीत भरपूर काम केलं आहेत, त्यामुळं कुणी युंगेंद्र किंवा जोंगेंद्र आले तरी फार काही फरक पडणार नाही, असं मिटकरी म्हणाले. रायगडमध्येही सुनील तटकरे यांची ताकद आहे. तिथं तटकरेंच्या विरोधात कुणीही उभं राहिलं तरी जनता योग्य उमेदवार निवडेल, असंही मिटकरी म्हणाले.
शरद पवार गटाचे 5 आमदार संपर्कात
दरम्यान, काँग्रेस आणि शरद पवार गटाचे अनेक आमदार अजित पवारांच्या संपर्कात आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक पक्षप्रवेश दिसतील. कॉंग्रेसचे 7 आमदार आणि शरद पवार गटाचे 5 आमदार अजित पवार यांच्याशी चर्चा करत आहेत. शरद पवार गटातील एका महत्त्वाच्या नेत्यानेही काल अजित पवारांची त्यांच्या बंगल्यावर भेट घेतली. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाभूकंप होईल. बरेच आमदार अजित पवारांच्या नेतृत्वात काम करतांना दिसतील, असंही मिटकरी म्हणाले.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे महायुतीत प्राधान्य अधिकाधिक जागा मागणे आणि जिंकणे हे आहे. राष्ट्रवादीचे सध्या 4 खासदार आहेत. आम्ही महायुतीत 10 जागांची मागणी केली आहे. आमची मागणी पूर्ण झाली तर आम्ही आमची ताकद नक्कीच दाखवू. लोकसभा निवडणुकीत अधिकाधिक जागा जिंकण्यावर आमचा भर असेल, असे ते म्हणाले.