Download App

Bachchu Kadu : दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं?; बच्चू कडूंनी गुवाहाटीतला ‘तो’ किस्सा रंगवून सांगितला

Bachchu Kadu : “हम गुवाहाटी न जाते तो हमे दिव्यांग मंत्रालय नहीं मिलता”, असं मोठं विधान प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केलं आहे. जळगावमध्ये एका आयोजित कार्यक्रमादरम्यान, बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी आपण गुवाहाटीत का गेलो? एकनाथ शिंदे यांना कोणत्या अटीवर पाठिंबा दिला होता? तसेच दिव्यांग मंत्रालय कसं मिळालं होतं? याबाबत पहिल्यांदाच भाष्य केलंय.

Manoj Jarange Patil यांची तब्येत खालावली, रुग्णालयात दाखल; जालन्याहून थेट संभाजीनगरला नेलं; नेमकं झालं काय?

बच्चू कडू(Bachchu Kadu) म्हणाले, आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून बदनाम झालो आहोत, आम्हाला खोके, खोके, म्हणून इतकं बदनाम केलं की कुठं बाहेर जावं की नाही, असं झालं होतं, कुठेही गेलो तर आले ‘खोके घेऊन, खोके घेऊन’ अशा घोषणा दिल्या जात होत्या पण मला कोणत्याही बदनामीची फिकीर नाही, “अगर हम गुवाहाटी न जाते तो हमे दिव्यांग मंत्रालय नहीं मिलता” असं म्हणत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी महाविकास आघाडी सरकारवर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

Delhi YashoBhoomi Photo : भारत मंडपम नंतर आता यशोभूमी तयार, उद्या पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन

जेव्हा एकनाथ शिंदे यांनी मला फोन केला तेव्हा मी सांगितलं की, उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असूनही दिव्यांग मंत्रालय मिळालं नाही, तुम्ही दिव्यांग मंत्रालय देत असाल तर सांगा नाहीतर मी गाडीतून लगेच उतरतो, माझ्या मागणीनंतर लगेचच एकनाथ शिंदे म्हणाले, आपण दिव्यांग मंत्रालय केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असं बच्चू कडू(Bachchu Kadu) यांनी सांगितलं आहे.

CM Shinde : आदर्श पतसंस्थेच्या संचालकांच्या प्रॉपर्टी जप्त करून ठेवीदारांचे पैसे देऊ; मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतर आम्ही पुन्हा दुसऱ्यांदा गुवाहाटीला गेलो होतो त्यावेळी एकनाथ शिंदेसोबत जेवायला बसलो तेव्हा मी पुन्हा दिव्यांग मंत्रालयाची आठवण करुन दिली. त्याचवेळी शिंदे साहेबांनी तिथून मुख्य सचिवांना फोन केला अन् मी 29 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार आहे, कॅबिनेटमध्ये दिव्यांग मंत्रालयाचा प्रस्ताव आला पाहिजे, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानंतर इतक्या जलद गतीने कोणतं मंत्रालय जर तयार झालं असेल तर त्याचं नाव दिव्यांग मंत्रालय असल्याचं बच्चू कडूंनी (Bachchu Kadu) स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, दीड ते दोन कोटी लोकसंख्या असलेल्यांचं मंत्रालय झालं पण दिव्यांगांच होत नव्हतं, उद्धव ठाकरे सरकारच्या काळात मीही राज्यमंत्री होतो पण दिव्यांग मंत्रालय झालं नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिव्यांगासाठी कर्तबगारीचा निर्णय घेतला असल्याचं म्हणत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतूक केलं आहे.

Tags

follow us