Mla Disqualification : सर्वोच्च न्यायालयाने अपात्र आमदारांचा निर्णय विधी मंडळाच्या अध्यक्षांकडे सोपवल्यानंतर आता सर्वांचंच लक्ष या सुनावणीकडे लागून राहिलं आहे. अशातच आता विधी मंडळात ही सुनावणी येत्या 13 तारखेला पार पडणार होती, मात्र, अचानक एक दिवस म्हणजे 12 तारखेला सुनावणी करण्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी(Rahul Narvekar) घेतला आहे. यावरुन मला सुनावणीमध्ये दिरंगाई करायची नाही म्हणूनच एक दिवस आधीच सुनावणी घेण्याच निर्णय घेतल्याचं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.
ABP C Voter Survey : लोकसभेपूर्वी भाजपला जोर का झटका; पाच राज्यांच्या सर्व्हेत ‘कमळ’ कोमजणार
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिल्लीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे. त्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहवं लागणार असल्यानेच एक दिवस आधीच अपात्र आमदारांच्या प्रकरणाची सुनावणी होत असल्याचंही नार्वेकरांनी सांगितलं आहे.
बाळासाहेबांनी अंगार फुलवला तिथे वैचारिक भंगार ऐकायला कोण जाणार? मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर हल्लाबोल
पुढे बोलताना ते म्हणाले, मला आमदार अपात्रता सुनावणीला विलंब लावायचा नाही. त्यामुळेच एक दिवस आधी सुनावणी घेऊन मी दिल्लीला रवाना होणार आहे. मला दिरंगाई करायची असती तर मी सुनावणी पुढे ढकलली असती, पण सुनावणी आधी घेतोय. त्यामुळे मला वेळ काढायचाय की लवकर निर्णय घ्यायचाय याबाबतचे उत्तर तुम्ही मिळवू शकता, असंही नार्वेकर म्हणाले.
Tiger 3 : एजंट झोयाच्या रूपात परतली कॅटरिना, टायगर 3 चे आणखी एक पोस्टर रिलीज
मागील काही दिवसांपासून विरोधकांकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर अनेक गंभीर आरोप करण्यात येत आहेत. सुनावणीच्या वेळापत्रकावरुनही विरोधकांनी त्यांना चांगलचं धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यावरुनही नार्वेकरांनी विरोधकांना चांगलच सुनावलं आहे. ते म्हणाले, ज्या टीका होताहेत, माझ्यावर आरोप केले जाताहेत, त्याच्या पाठीमागचे हेतू मला संपूर्णपणे माहिती आहेत. पण, या टिका-टिप्पणीतून माझ्या निर्णयावर कोणाताही फरक पडणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.
तसेच जे लोक माझ्यावर आरोप करत आहेत. त्यांना या निर्णय प्रक्रियेवर परिणाम टाकायचा असेल, त्यामुळे ते टीका करताहेत. पण अशा प्रकारच्या टिप्पणीतून माझ्यावर कसलाही दबाव पडणार नाही किंबहूना तो मी पडू देणार नाही, असं ते म्हणाले आहेत.