Mla Parinay Fuke : जर अभिजित दीपके श्रीकृष्णाचा अवतार तर उद्धव ठाकरे कंसाचा असल्याची जहरी टीका आमदार परिणय फुके (Mla Parinay Fuke ) यांनी केली आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी कॉंक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांना जाहीर पाठिंबा दिला होता. त्यानंतर आंदोलनाला यश मिळाल्यानंतर दीपके यांनी ठाकरेंचा आवर्जून उल्लेख केला. उद्धव ठाकरे आणि अभिजित दीपकेंच्या नावाची चर्चा सुरु असतानाच आता परिणय फुके यांनी जहरी टीका केलीयं.
कर्जमाफीचा मार्ग मोकळा! जिल्ह्यात 1 लाख 32 हजारांपेक्षा अधिक शेतकऱ्यांची पाहिली यादी जाहीर
पुढे बोलताना आमदार फुके म्हणाले, उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरेंच्या लग्नाकडे जास्त लक्ष द्यावं. अभिजित दीपके कृष्णाचा अवतातर तर उद्धव ठाकरे कंसाचा अवतार असतील, म्हणून हा भास ठाकरेंना होत आहे. सध्या ठाकरे दीपकेंच्या मामांची भूमिका बजावत आहेत, असं फुके म्हणाले आहेत.
बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना असे संजय राऊत..
देशात कुठेही आंदोलन असलं तरी त्याच्यावर वक्तव्य करुन संजय राऊत फुटेज घेतात. पुण्यात अजित डोबाल यांना लोकमान्य टिळक पुरस्कार मिळणार आहे. याला विरोध करण्याचा कारण नाही. काहीतरी विरोध करुन मीडियात यायचं हाच छोट्या-मोठ्या संघटनांचा प्रयत्न असतो, असंही आमदार फुके म्हणाले आहेत.
नीटच्या मुद्द्यावर विद्यार्थ्यांनी आंदोलन उभं केलं, कुठेतरी कॉंग्रेसमध्ये असुरक्षिततेचं वातावरण आहे. कॉंग्रेसला आपलं स्थान संपुष्टात येताना दिसंतय. देशातले विषय छोटे-मोठे पक्ष उचलत आहे. त्यामुळे कॉंग्रेसमध्ये अस्थिरतेचं, असुरक्षिततेचं वातावरण असल्याचं परिणय फुके म्हणाले आहेत.
राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीयं. या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. महाराष्ट्राच्या तिजोरीतून योजनेला पैसे जाणार आहे. पंतप्रधानांच्या नावे असलेल्या योजना केंद्र सरकार पुरस्कृत आहे. नमो सन्मानचे पैसेही नक्की मिळणार असल्याचं आमदार फुके यांनी स्पष्ट केलंय.
