MLA Rohit Pawar On Case filed: मतदारयाद्यांमधील घोळ दाखविण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आधार कार्ड काढले होते. फेक आधार कार्ड कसे बनविले जाते हे रोहित पवारांना (Rohit Pawar) दाखवायचे होते. परंतु आता खोटो आधारकार्ड काढल्याप्रकरणा रोहित पवार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यावरून आता रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर जोरदार टीका केलीय. तसेच सरकारने किती गुन्हे दाखल केले तरी मी सरकारच्याविरोधात बोलत राहणार आहे, अशी भूमिका रोहित पवारांनी जाहीर केलीय.
Video : डाव प्रतिडावानेच मोडावा लागणार; फडणवीसांच्या भेटीपूर्वी जरांगेंनी बच्चू भाऊंना दिलं बळ
रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी बोलताना सांगितले होते की माझ्यावर गुन्हा दाखल होईल. त्यांनी कोणीतरी मिसगाइड केले असे वाटत आहे. पण जसे ते म्हणाले, तसा एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मी मतचोरीबद्दल मी एक डेमो केला होता. लोकांपर्यंत गेलो होतो. यात माझे नाव डायरेक्ट नसलं तरी येत्या काळात माझं नाव घेतलं जाऊ शकतं. अंधविश्वासबाबत प्रबोधन करत असेल डेमो केला असेल, डेमो अंधश्रद्धेच्या विरोधात केलं जाईल तशी कारवाई माझ्यावर झाले असे म्हणावेल लागेल. राज्यातील अवैध धंद्यावर कारवाई न करता माझ्यावर कारवाई झाली आहे.
राज्यात पीक पाहणीला 30 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; महसूल मंत्री बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
चौकशीसाठी पंधरा दिवस कशासाठी ?
खोट्या आधारकार्डचा वापर मतचोरीसाठी कसा केला जातो हे दाखवलं आहे. प्रेझेंटेशन बनवायला एक दिवस लागला आहे. मात्र या चौकशीसाठी 15 दिवस कशासाठी असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केलाय. भाजपचे 40 पैशाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला. मी फक्त चोरी कशी केली जाते याचे डेमो दाखवत होतो. कोणाच्या प्रतिष्ठेला हानी केली नाही. मग तुमच्या प्रतिष्ठेला कशी हानी पोहचली असे रोहित पवार म्हणाले.
देवेंद्र फडणवीस हुशार नेते आहेत. ते वकील आहेत मी त्यांच्या विरोधात, सरकारच्या विरोधात गेले काही महिने वर्षे बोलत आहे. त्याच्यामुळे हे सरकार कुठे ना कुठे अडचणीत आले असल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा मी सरकारच्या विरोधात बोलत राहणार असे रोहित पवार म्हणाले.
