MLA Rohit Pawar : गेल्या काही दिवसांत राज्यातील शासकीय रुग्णालयांत रुग्णांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या. नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील (Government Hospital) ४१ रुग्णांचा झाला. यावरून कोर्टाने सरकारची चांगलीच कानउघाडणी केली. त्यानंतर तरी प्रशासन आरोग्य विषयक पायाभूत सुविधा देईल, असं वाटलं होतं. मात्र, अद्यापही राज्यातील अनेक रुग्णालयात पायाभूत सुविधांचा अभाव आहे. यावरूनच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (MLA Rohit Pawar) सरकावर टीका केली.
अखेर नवी मुंबई मेट्रोला मुहूर्त मिळाला! PM मोदींच्या हस्ते ‘या’ दिवशी लोकार्पण
उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का? असा सवाल रोहित पवारांनी केला.
माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी ठप्प झालंय.. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असलेल्या मा.… pic.twitter.com/sZn1QDojWN
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 22, 2023
रोहित पवारांनी ट्विटवर पोस्ट करत लिहिलं की, माझ्या मतदारसंघातील कर्जत आणि जामखेड या दोन्ही ठिकाणच्या शासकीय रुग्णालयांचं काम अर्धवट होऊन निधीअभावी रखडलं आहे.. अर्थमंत्री अजितदादा आहेत, मात्र, या रुग्णालयासाठी आपल्या संमतीशिवाय, निधी द्यायचा नाही, अशा सूचना फडणवीस साहेब आपण दिल्यात. हा आपल्या समकक्ष असललेल्या मा. अजितदादांच्या खात्यावर अंकुश ठेवण्याचा प्रकार असून तो योग्य वाटत नाही…. आणि दुसरं म्हणजे, उपचाराअभावी एखाद्याचा बळी गेल्यास त्याची जबाबदारी आपण आणि आरोग्यमंत्री घेणार का? असा सवाल रोहित पवारांनी केला.
त्यांनी पुढं लिहिलं की, राजकारण तर आपण नेहमीच एकमेकांच्या विरोधात करतोय… पण, ते विचारांचं आणि तत्वांचं असावं.. राजकारणापायी सामान्य माणूस भरडला जाऊ नय, हे आपल्यासारख्या मोठ्या नेत्याला सांगण्याची वेळ यावी, यापेक्षा दुर्दैव ते काय!, अशी टीका रोहित पवारांनी केली. हे शेअर केलेले फोटो बघितले तर इतंक काम होऊनही एक रुपयाचा निधी दिलेला नाही आणि अशीच अवस्था राज्यातील इतर २६ कामांची आहे. मायबाप सरकार हे आपल्याला तरी योग्य वाटतं का? असं ट्विट रोहित पवारांनी केलं.
काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राज्यातील आरोग्यविषयक पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी नवीन रुग्णालयांना मंजुरी देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, कर्जत आणि जामखेड मतदारसंघातील शासकीय रुग्णालयांन निधि दिला नसल्याचा आरोप रोहित पवारांनी केला. फडणवीसांकडून अजित पवारांच्या खात्यावर अंकुश ठेवल्या जात असल्यातं त्यांनी म्हटलं. यावर आता फडणवीस काय प्रत्युत्तर देणार, हेच पाहणं महत्वाचं आहे.