Download App

शेळकेंचा अहंकार वाढला, मावळची जनता…; रोहित पवारांची सडकून टीका

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरदचंद्र पवार अध्यक्ष शरद पवा (Sharad Pawar) यांनी मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना थेट इशारा दिला होता. यानंतर शेळके यांनीही शरद पवारांना उत्तर दिलं होतं. त्यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी शेळकेंवर जोरदार टीका केली. शेळकेंचा अहंकार वाढला आहे, त्यांचा अहंकार मावळची जनता नक्की उतरवेल, असा इशारा रोहित पवारांनी दिला.

शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज : मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला येणार वेग ; 40 हजार कोटींची गुंतवणूक 

आमदार रोहित पवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना त्यांनी सुनील शेळके यांचा जोरदार समाचार घेलता. रोहित पवार म्हणाले की, सुनील शेळके यांना अहंकार चढला आहे.त त्यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या येत असल्याच्या तक्रारी आहेत. शेळके यापूर्वी भाजपमध्ये होते. नंतर राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे. आता ते अजित पवार गटात आहेत. दमदाटी करूनही शेळके असं काही केलंच नाही, असं सांगतात. शेळकेंना भाजप प्रमाणे खोटं बोलण्याची सवय लागली. ते पवार साहेबांबद्दल खालच्या भाषेत बोलत असतील तर कार्यकर्त्यांना किती दमदाटी करत असतील? शरद पवारांवर खालच्या भाषेत टीका केल्यामुळं मी त्यांचा निषेध करतो. एका अनुभवी नेत्यांवर टीका करता, हे मावळचे मतदार सहन करणार नाहीत. शेळकेंचा वाढलेला अहंकार मावळची जनता नक्की उतरवेल, असा इशारा रोहित पवारांनी दिला.

Letsupp Special : फडणवीसांपासून शेळकेंपर्यंत… पवार मैदानात उतरतात तेव्हा भल्या भल्यांचा घाम काढतात!

शेळके हे भाजच्या तिकीटावर निवडणूक लढतील. अजित पवार गटाचे 12 आमदार भाजपमध्ये जाणार आहेत. त्यात शेळकेंच नाव आहे. लोकसभेनंतर अजित पवार यांच्या गटातील २२ आमदार शरद पवार यांच्यासोबत येतील, असे रोहित पवार म्हणाले.

बारामतीमध्येही मलिदा गॅंग
पुढं बोलतांना रोहित पवार म्हणाले की, बारामतीमध्येही आमच्या कार्यकर्त्यांना धमक्या आणि दमदाटी होत असल्याच्या तक्रारी आहेत. बारामतीमध्ये एक मलिदा गॅंग आहे. अजित पवारांचं त्यांना पाठबळ आहे. पूर्वी अजितदादा गुंडांना दूर ठेवत होते. आता भाजपसोबत गेल्यापासून त्यांचे फोटो गुंडांसोबत येत आहेत. त्यामुळे अजितदादा बदलले आहेत. मात्र, शरद पवार साहेबांच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. मावळ असो वा बारामती, तिथली जनता हुशार आहे, असं रोहित पवार म्हणाले.

नेमकं पवार काय म्हणाले?
शरद पवार गटाचा कार्यकर्ता मेळावा लोणावळा येथे आज पार पडला. या मेळाव्यात शरद पवार यांनी आमदार सुनील शेळके यांना थेट इशारा दिला होता. त्यानंतर दोन्ही गटातील वातावरण तापत असल्याचे दिसत आहे. स्थानिक आमदार सुनील शेळके हे राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांना त्रास देत असल्याचे शरद पवार यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी शेळकेंना इशार दिला होता. मला शरद पवार म्हणतात, खबरदार इथल्या कार्यकर्त्यांना पुन्हा दमदाटी कराल तर अशा शब्दात शरद पवारांनी शेळकेंचा समाचार घेतला.

त्यानंतर आमदार सुनील शेळकेंनी पत्रकार परिषद घेऊन पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. शरद पवारांच्या वक्तव्याने मला दु:ख झाले आहे. साहेबांनी कधीच वैयक्तिक टीका केली नाही. त्यांना ही चुकीची माहिती देण्यात आली. मी कोणत्याही कार्यकर्त्याला त्रास दिला नाही. पुढच्या ८ दिवसांत मी दम दिलेला एकतरी व्यक्ती समोर आणा, पुरावे द्यावेत, नाहीतर शरद पवारांनी खोटे आरोप केले, असं मी राज्यभर सांगेल, असं शेळके म्हणाले.

 

 

 

follow us