योगेश सावंतवरून सभागृहात आरोप-प्रत्यारोप; रोहित पवार म्हणाले, ‘होय, योगेश आमचा कार्यकर्ता…’

  • Written By: Published:
योगेश सावंतवरून सभागृहात आरोप-प्रत्यारोप; रोहित पवार म्हणाले, ‘होय, योगेश आमचा कार्यकर्ता…’

Rohit Pawar : अर्थसंकल्पीय अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे पहिल्या दोन दिवसांत मोठा वादंग झाला होता. तर आता सांताक्रुझ पोलिसांनी (Santa Cruz Police) अटक केलेल्या योगेश सावंत (Yogesh Sawant) प्रकरणी भाजप आमदारांनी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला.

PM मोदींची गाजलेली भाषणं मराठीत; सुनील देवधर संकलित ‘नमो उवाच’ पुस्तकाचे प्रकाशन 

यावेळी योगेश सावंत आणि रोहित पवारांचा काय संबंध असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. त्यावर रोहित पवारांनी माध्यमांशी बोलतांना यावर खुलासा केला. होय, योगश सावंत हा कार्यकर्ता आहे, असं ते म्हणाले.

योगेश सावंत यांच्या एका सोशल पोस्टचा संदर्भ देत भाजप आमदार राम कदम यांनी देवेंद्र फडणवीसांना संपवण्याची भाषा केल्याचा दावा केला. एका व्हायरल क्लिपममध्ये राज्यात जातीवाद पसरवण्याचं षडयंत्र दिसत आहे. व्हिडिओमध्ये एक इसम म्हणतो की, देवेंद्र फडणवीसला महाराष्ट्राच्या मातीत गाडणार. फडणवीस यांच्याप्रमाणे महाराष्ट्रातील संपूर्ण ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवून टाकू. याचं नाव आहे योगेश सावंत. याचे संबंध बारामतीहून आहेत. तिथल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना शरद पवार गटाचा आमदार व शरद पवारांचा नातून रोहित पवार फोन करून योगेश सावंतला सोडायला सांगतो. काय संबंध हे रोहित पवारचा? असा सवाल कदम यांनी केला.

सदावर्तेंची ‘वकिली’ डंके की चोट पे पुन्हा सुरू होणार; रद्द झालेली सनद बहाल 

कदम यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांची नावे घेतल्याबाबत विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला. मात्र, आशिष शेलारांनी शरद पवारांचं नाव घेतलंच नसल्याचा दावा केला. तसेस या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणीही केली. त्यावर तालिका अध्यक्षांनीही चौकशीचे आदेश दिले. मात्र, सत्ताधारी आमदारांच्या या दाव्यांवर रोहित पवार यांनी जोरदार शब्दात प्रत्युत्तर दिले आहे.

रोहित पवार म्हणाले योगेश सावंत कार्यकर्ता
रोहित पवार यांनी विधान भवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर प्रतिक्रिया दिली. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणलं होतं. त्याचा जबाब घेतला. आता त्याला कोर्टात नेत आहे. मी त्याला स्वत: भेटण्यासाठी चाललो आहे. उगाच सत्ताधाऱ्यांनी तिथं अॅक्टिंग करू नये. जाहीरपणे सांगतोय ना, तो आमचा कार्यकर्ता आहे, असं रोहित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube