सदावर्तेंची ‘वकिली’ डंके की चोट पे पुन्हा सुरू होणार; रद्द झालेली सनद बहाल
Gunratna Sadavarte : वकील गुणरत्न सदावर्ते ( Gunratna Sadavarte ) यांना बार काऊन्सिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरत निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार काऊन्सिलने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनादरम्यान वकिलांसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन आणि बेजबाबदार विधान केल्या प्रकरणी यांच्या विरोधात शिस्तभागाची कारवाई केली होती.
Bill Gates : ‘चाय पे चर्चा’, बिल गेट्सला नागपुरातील डॉली चायवाल्याच्या स्टाईलची भुरळ
काय आहे नेमकं प्रकरण?
गुणरत्न सदावर्ते यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या हिंसक आंदोलनाला पाठिंबा दिला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल केला होता. या आंदोलनादरम्यान सदावर्ते यांनी माध्यमांसमोर वारंवार बेजबाबदार विधान केली. तसेच वकिलांसाठीचा पांढरा बँड परिधान करून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप सदावर्ते यांच्यावर होता.
विधानसभेचे अध्यक्षपद किती महत्वाचे असते? नाना पटोले अन् काँग्रेसला ‘हिमाचल प्रदेश’ने दिले उत्तर
त्यावर पिंपरी न्यायालय वकील संघटनेचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते नितीन यादव यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन सदावर्ते यांच्याविरुद्ध शिस्तभमगाची कारवाई सुरू केली होती. त्यावर सदवर्ते यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर मार्च 2023 मध्ये न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्यासमोर सुनावणी पार पडली होती.
यावेळी समाज माध्यमांवर प्रसिद्ध करण्यात आलेला व्हिडिओ देखील न्यायालयात दाखवण्यात आला. यामध्ये सदावर्तेंची अल्पवयीन मुलगी विनापरवाना गाडी चालवत असल्याचे दिसून आलं. मात्र अशा प्रकारच्या तक्रारींची दखल वकील संघटना कशी काय घेऊ शकते? अशी विचारणा करत न्यायालयाने सदावर्ते विरोधातील तक्रार फेटाळण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आता वकील गुणरत्न सदावर्ते यांना बार काऊन्सिल ऑफ इंडियाने मोठा दिलासा दिला आहे. गुणरत्न सदावर्ते यांची सनद दोन वर्षांकरत निलंबित करण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे.