PM मोदींची गाजलेली भाषणं मराठीत; सुनील देवधर संकलित ‘नमो उवाच’ पुस्तकाचे प्रकाशन
PM Narendra Modi Speech Book : पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात त्यावेळी त्यांच्या प्रत्येक भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून करतात. मराठीजनांना त्यांच्याच भाषेत कनेक्ट करण्याची किमया मोदी साधतात. नंतर त्यांच्या भाषणात हिंदी भाषा असते. आता मात्र त्यांची अलीकडच्या काळातील अशीच काही गाजलेली भाषणं चक्क मराठी भाषेतून वाचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. भाजप नेते सुनील देवधर (Sunil Devdhar) यांनी पंतप्रधान मोदींची भाषणे मराठीत संकलित केली आहेत.
‘नमो उवाच’ नावाच्या पुस्तकात हिंदी भाषेतील या भाषणांचा मराठीत अनुवाद करण्यात आला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन आज पुण्यात उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री ब्रिजेश पाठक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सुनील देवधर, भाजप महाराष्ट्रचे उपाध्यक्ष माधव भंडारी, राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, आ. माधुरी मिसाळ, आ. तापकीर, आ. सिद्धार्थ शिरोळे, माजी आमदार जगदीश मुळीक आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.
Pune Loksabha : तुम्ही पक्षाचे धक्कातंत्र पाहिले आहे ना ? सुनील देवधरांनी पुण्यात शड्डू ठोकला !
याप्रसंगी देवधर म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या आताच्या सात भाषणांचं हे पुस्तक आहे. यात पंतप्रधान मोदींचं अयोध्येतील राम मंदिराचं भाषण, पंचायत राज म्हणून त्यांनी पंचायतींसमोर त्यांनी केलेले भाषण त्यानंतर आझादी का अमृत महोत्सव म्हणून लाल किल्ल्यावर त्यांचं जे भाषण झालं अशा सात महत्वाच्या भाषणांचा समावेश या पुस्तकात आहे, अशी माहिती सुनील देवधर यांनी यावेळी दिली.