Download App

फडणवीससाहेब, हा अहंकाराचा कळस, तुमच्या पापाचा घडा…; रोहित पवारांचा हल्लाबोल

फडणवीस साहेब, हा महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश नाही. त्यामुळं तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही

  • Written By: Last Updated:

Rohit Pawar On  Devendra Fadnavis  : पुण्यात भारतीय जनता पक्षाच्या अधिवेशनाता बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं. पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते, काल काय बोललो हे लोकांच्या आज लक्षात राहत नाही, असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याचा आता शरदचंद्र पवार पभाचे आमदार रोहित पवा (Rohit Pawar) यांनी चांगलाच समाजार घेतला.

दिग्गज नेत्यांच्या भाऊगर्दीत अशोक चव्हाण हरवले; कोपर्‍यातील खुर्चीवर मिळाले स्थान 

फडणवीस साहेब, हा महाराष्ट्र आहे, मध्य प्रदेश नाही. त्यामुळं तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिलं.

रोहित पवार यांनी एक्सवर फडणवीसांचा एक 52 सेकंदाचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांवर निशाणा साधला. रोहित पवार यांनी लिहिलं की, पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते, कारण आपण काल काय बोललो, हे आज लोकांना लक्षात राहत नाही, हे आपलं वक्तव्य म्हणजे अंहकाराचा कळस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारे शॉर्ट मेमरी म्हणणे महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला.

मुंडे, तावडे फ्रंट सीटवर; राज्याच्या राजकारण दोघांचेही जबरदस्त कमबॅक

रोहित पवारांनी पुढं लिहिलं की, एखाद्या योजनेचे 1500 रुपये दिले म्हणजे तुमच्या सरकारने केलेली पापं, भ्रष्टाचाराचे कारनामे, सत्तेची मस्ती, महाराष्ट्राच्य अस्मितेचे तोडलेले लचके आणि त्यातून महाराष्ट्राला झालेला मनस्ताप महाराष्ट्राचा शेतकरी, युवा, महाराष्ट्राची जनता विसरेल, असा तुमचा समज असेल तर मग महाराष्ट्र तुम्हाला अजून कळलेलाच दिसत नाही, असं त्यांनी लिहिलं.

निवडणुकीच्या तोंडावर योजना का आणल्या? हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला माहित आहे. हा महाराष्ट्र आहे. मध्यप्रदेश नाही. त्यामुळं तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा असा इशाराही रोहित पवारांनी दिला.

फडणवीस काय म्हणाले?
योजना या ठिकाणी आपण आणली आहे आणि म्हणून तुम्हाला फक्त एवढंच सांगायचे आहे की, जोपर्यंत आम्ही रोज योजनेबद्दल बोलणार नाही, आम्ही रोज सांगणार नाही, प्रत्येकाची तोंडी योजनाच असायला पाहिजे. जो भेटेल त्याला योजनेची माहिती सांगितली पाहिजे. लग्नात गेलं तरी लोकांना योजनेबद्दल सांगावं. त्यानंतर लग्नाला जावा. कारण पब्लिक मेमरी शॉर्ट असते. काल आपण काय बोललो ते आज लोकांना आठवत नाही, असं फडणवीस म्हणाले.

https://www.youtube.com/watch?v=PZMv_d0e7RU

 

follow us