Sanjay Shirsat : शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महायुतीला पाठिंबा द्यावा, असं आवाहन केलं. आज दसरा मेळ्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी पॉडकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेला संदेश दिला आहे. तसेच जनतेने आता मतदानाच्या शस्त्राचा वापर करून क्रांती करावी, असं आवाहन केलं. यानंतर आमदार संजय शिरसाटांनी राज ठाकरेंना महायुतीला (Mahayuti) पाठिंबा देण्याचं आवाहन केलं.
फिरोज नाडियाडवाला आणि इरोस यांच्यातील वाद मिटला, हेरी फेरी चित्रपटाचे राईट्स विकत घेतले
संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. राज ठाकरेंनी केलेल्या विधानाविषयी विचारले असता शिरसाट म्हणाले, क्रांती करायला हवी आणि आम्ही एक क्रांती केली. आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्वाचे विचार घेऊन पुढं आलो. आता राज ठाकरेंनी देखील आमच्या क्रांतीला पाठिंबा द्यावा, असं शिरसाट म्हणाले.
पुढं ते म्हणाले, राज ठाकरेंनी आम्हाला पाठिंबा द्यावा, खरे सोने विकायचे असेल तर आपली वज्रमूठ एक असली पाहिजे. तुम्ही सोबत आले तर महाराष्ट्रात क्रांती घडवू, असं म्हणत शिरसाट यांनी राज ठाकरे यांना थेट महायुतीमध्ये सहभागी होत पाठिंबा देण्याचे आवाहन केलं.
Video : ‘तो’ गोरागोमटा मुलगा; खच्चून भरलेल्या मेळाव्यात पंकजांकडून मुलाचं राजकीय लाँचिंग
काय म्हणाले राज ठाकरे?
राज ठाकरे म्हणाले, ही क्रांतीचा वेळ आहे. महाराष्ट्रात वेड्या वाकड्या युत्या आणि आघाड्या करण्यात आल्या. आता या सर्वांचा वचपा घेण्याची वेळ आलीय. यंदाच्या निवडणुकीत बेसावध राहून चालणार नाही. दरवर्षी तुम्ही बेसावध आणि गाफील राहत असता आणि तिकडे राजकीय पक्ष हे आपापले खेळ करत बसतात. या सगळ्यात तुम्ही महाराष्ट्राची प्रगती कुठे पाहता? कुठे आहे महाराष्ट्राची प्रगती? केवळ रस्ते आणि उड्डाणपूल बांधणे म्हणजे प्रगती नसते.
तुमच्या घरात मोबाईल आले, रंगीत टिवी आले, पण, हे गॅजेट्स म्हणजे तुमची प्रगती नाही. प्रगती ही बुद्धीने व्हावी लागत असते. ज्यावेळी आपण जगात किंवा परदेशात जातो आणि तिथली सुविधा पाहतो, त्याला प्रगत देश म्हणतात. आणि आपण मात्र, अजूनही आपण चाचपडत राहतो. इतकी वर्षे प्रगतीच्या थापा मारून देखील तुमच्या मनातील राग व्यक्त होतांना दिसत नाही. त्याचं लोकांना निवडून देता राहता आणि त्यानंतर पश्चातापाचा हात डोक्याला मारत बोंबा मारत बसत. किमान यावेळी तरी असं करू नका, क्रांती करा, असं ते म्हणाले.