Video : ‘तो’ गोरागोमटा मुलगा; खच्चून भरलेल्या मेळाव्यात पंकजांकडून मुलाचं राजकीय लाँचिंग
बीड : दसरा मेळाव्याला राजकीय फैरी झाडल्या जाणार याचा अंदाज सर्वांनाच असतो. त्याप्रमाणे आज (दि.12) बीडमध्ये भगवान गडावर पंकजांचा तर, नारायण गडावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा (Manoj Jaranage) दसरा मेळावा पार पडला. या दोन्ही ठिकाणांहून पंकजा आणि जरांगेंनी तुफान फटके बाजी केली. मात्र, भगवान गडावरील मेळ्याव्यात पंकजा मुंडेंनी (Pankaja Munde) त्यांच्या मुलाची करून दिलेली ओळख सध्या राजकीय चर्चेचा विषय बनला आहे. (Pankaja Munde Introduced Her Son In Bagwan Gad Dasara Melava)
Video: आचारसंहितेनंतर मुख्य भूमिका जाहीर करणार तेव्हा मी सांगेल ते ऐकायचं; जरांगेंनी शड्डू ठोकला
तो गोरागोमटा मुलगा… काय म्हणाल्या पंकजा?
भगवानगडावरून उपस्थितांना संबोधित करताना पंकजा म्हणाल्या की, तो गोरागोमटा मुलगा पंकजा मुंडे यांचा मुलगा आर्यमन आहे. हा माझ्यापेक्षा उंच, फार गोड आहे. भगवान बाबांच्या दर्शनाला आला आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं. त्यानंतर त्यांनी तुम्हाला वाटत असेल आर्यमन मला जास्त प्रिय आहे. पण मी त्याला सांगितलंय, मला तुझ्यापेक्षा माझी जनता जास्त प्रिय असल्याचे सांगून टाकले.
पंकजांनी जरी आर्यमनपेक्षा जनता जास्त प्रिय असल्याचे सांगितले असले तरी, खच्चून भरलेल्या दसरा मेळाव्यात पंकजांनी त्यांच्या मुलाची ओळख करून दिल्याने हे एकप्रकारे विधानसभेच्या तोंडावर राजकीय लाँचिंग असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. जेव्हा माझ्यावर जीएसटीचा छापा पडला होता तेव्हा 12 कोटी जनतेने भरले होते, तुम्ही सर्वांनी माझ्यावर मुलीसारखं प्रेम केल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या.
नवा मेळावा सुरू करून भगवानगड मेळाव्याची पवित्रता कुणी संपवू शकत नाही; धनंजय मुंडेंचा जरांगेंना टोला
मी कुणाला घाबरत नाही, पंकजांचा एल्गार
भाषणाला सुरूवात करताना पंकजांनी हिंदी कवितेने केली. त्या म्हणाल्या की, मैं गोपीनाथ मुंडे की बेटी हूँ, माझा मुलगा आर्यमानपेक्षा ही जनता मला जास्त प्रिय आहे. पोटच्या लेकरापेक्षा मी तुमच्यावर माया करते. माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा या लोकांनी जीव दिल्याचे म्हणत इथल्या लोकांवर मी पोटच्या लेकरापेक्षा जीव लावते, आणि आई वडिलांपेक्षा जास्त तुम्ही माझ्यावर प्रेमा करता असे म्हणत लक्ष्मण हाके म्हणजे गोंडस लेकरू असल्याचे पंकजा म्हणाल्या. माझ्या दसऱ्या मेळाव्याला कोणाला मी निमंत्रण देत नाही, पण जे सन्मान करून इथं आले त्यांचं मी इथे मनापासून स्वागत करते असे पंकजा म्हणाल्या. येथे आलेले 18 जातीचे बांधव तुम्हाला मी दरवर्षी साष्टांग दंडवत घालते. कारण माझ्या वडिलांनी मरताना माझ्या झोळीमध्ये तुमची जबाबदारी टाकली असल्याचे पंकजा म्हणाल्या.
आपल्याला आपला डाव खेळायचाय – पंकजा मुंडे
उपस्थितांना संबोधित करताना पंकजा म्हणाल्या की, मी कुणाला घाबरत नसून, माझं भाषण ऐकायला आलेल्यांना मी घाबरते असे म्हणत. आपल्याला आपला डाव खेळायचा असल्याचे पंकजा म्हणाल्या. तुम्ही मला जिंकवून इज्जत दिली. माझा पराभव झाल्यानंतर त्याहून इज्जत दिली मी हरल्यामुळे अजितबात नाराज नाही. उसतोड कामगारांचे जीवन बदलल्याशिवाय शेवटचा श्वास घेणार नाही असे म्हणत मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात येणार असल्याचे पंकजा म्हणाल्या.
तुमच्यातील राग दिसत नाही; आता वचपा काढण्याची वेळ, राज ठाकरेंनी शुभेच्छा देताना केलं ‘हे’ आवाहन
…म्हणून मी कधी वेगळा दसरा मेळाव्याचा विचार केला नाही
बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेल्याचे म्हटले. पवित्र दसरा मेळाव्याची आगळी वेगळी परंपरा आहे. मुंडे साहेबांनी शेवटच्या श्वासापर्यंत सुरू ठेवली त्यानंतर भगिनी पंकजा मुंडे यांनी सुरू ठेवली. याचा मला अभिमान असल्याचेही मुंडे म्हणाले.
अनेक वेळा संकटाच्या काळात गोपीनाथ मुंडे साहेबांपासून पंकजा मुंडेपर्यंत तुम्ही माझ्या बहिणीच्या पाठीमागे उभे राहिलात. अनेक संघर्षात तुम्ही मेळावा केला, सोबत कोण आहे बघितलं नाही. भाऊ आहे की नाही हे पाहिलं नाही. जरी 12 वर्ष आपलं पटलं नाही. तरी मी वेगळा मेळावा करण्याचा विचार मनात आणला नाही. कारण ज्याला जो वारसा दिला आहे, त्यानेच तो चालवावा असे मुंडे म्हणाले.
गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार महामंडळ; अपघातग्रस्त अनुदान योजनेचं कवच, धनंजय मुंडेंनी मानले आभार
हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे
संघर्षाच्या काळात आपण एक राहणं गरजेचं असल्याचे आवाहनही धनंजय मुंडे यांनी उपस्थितांना केले. बारा वर्षाच्या तपानंतर मी इथे आलोय असे म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी आपण भारावून गेलो आहे. पंकजा मुंडेंनी खूप संघर्ष केला आहे. या पवित्र दसरा मेळाव्याच्या दिवशी शेरोशायरी करायची नाही. पण तरीही सांगतो. आपण सर्वजण या संघर्षात एक आहोत. ‘तुम लाख कोशिश करो हमे हराने की हम जब जब बिखरेंगे दुगुनी रफ्तारसे निखरेंगे’ अशा शायरीने धनुभाऊंनी त्यांच्या भाषणाचा शेवट केला.