Download App

लोकसभेला सुजय विखेंना मदत केली का? आमदार सत्यजित तांबेंचं बेधडक उत्तर

लोकसभा निवडुकीत मी जिथं पाहिजे होतो, तिथंच होतो. माझं निलंबन झालं असल्याने कॉंग्रेसने माझ्यावर अधिकृतरित्या कोणतीही जबाबदारी दिली नव्हती.

  • Written By: Last Updated:

Satyajit Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेंनी (Satyajit Tambe) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून विजय प्राप्त केला होता. त्यामुळं कॉंग्रेसमधून त्यांचं निलंबन करण्यात आलं होतं. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत सुजय विखेंनी (Sujay Vikhe) त्यांना मदत केल्याची चर्चा आहे. यावर आता खुद्द सत्यजित तांबेंनी भाष्य केलं.

Warali Accident : अभिनेते जयवंत वाडकरांच्या पुतणीचा जीव घेणाऱ्या मिहीरला 16 जुलैपर्यंत पोलीस कोठडी 

लेट्सअप मराठीला आमदार सत्यजित तांबेंनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. विखेंनी तुम्हाला विधान परिषदेत मदत केल्याची चर्चा आहे, तर तुम्हीही त्यांना लोकसभेला मदत केली का? असा सवाल तांबेंना केला असता ते म्हणाले की, या प्रश्नाचं उत्तर सुजय विखेच देऊ शकतील. विधान परिषदेच्या निडणुकीला मी अधिकृतरित्या कोणत्याही पक्षाचा पाठिंबा मागितला नव्हता. त्यामुळं भाजपचा पाठिंबा मला मिळाला किंवा भाजपच्या वरिष्ठांचा तसा आदेश आला असेल, असं मला वाटत नाही. मात्र, जिल्ह्यातला उमेदवार म्हणून सत्याजित तांबेच्या पाठीशी आहोत, असं विधान राधाकृष्ण विखेंनी केलं होतं. त्यामुळं ते माझ्या पाठीशी उभे राहिले असतील तर मला फायदाच झाला असेल, असं तांबे म्हणाले.

रणनीती की स्वातंत्र्य.. ‘नाटो’ला नकाराचा भारताचा अजेंडा काय?, वाचा इंट्रेस्टिंग फॅक्टस्… 

ते म्हणाले, राहिला प्रश्न मी त्यांना लोकसभेला मदत करण्याचा. तर माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता लोकसभेला फार काही करू शकत नाही. मात्र, लोकसभा निवडणुकीत मी जिथं पाहिजे होतो, तिथेच होतो. माझं निलंबन झालं असल्याने कॉंग्रेसने माझ्यावर अधिकृतरित्या कोणतीही जबाबदारी दिली नव्हती. मात्र, कॉंग्रेस उमदेवारांच्या मदतीला जाण्याचा माझा या निवडणुकीत प्रयत्न होता, असं तांबे म्हणाले.

नगर दक्षिणच्या निकालावर काय बोलले?
यावेळी बोलतांना त्यांनी नगर जिल्ह्यातील लोकसभा निडणुकीच्या निकालावरही भाष्य केलं. ते म्हणाले, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे निवडून आले. कारण, त्यांनी खासदार असतांना चांगलं नेटवर्क तयार केलं होतं. त्यांचा जनसंपर्कही दांडगा होता. त्यामुंळं तेच निडणुन येतील असा अंदाज होता. मात्र, नगर दक्षिणची लढाई फारच ताकदीची होती. त्यामुळं तिथं अंदाज बांधण अवघड होतं. सुजय विखेंनी त्यांनी खासदार म्हणून म्हणून पाच वर्ष काम केलं. त्यांचे वडील पालकमंत्री आहेत. गावपातळीपर्यंत त्यांची यंत्रणा होती. तर लंकेंनाही चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळं ही निडणुक प्रतिष्ठेची होईल, हे ठाऊक होतं. मात्र, निकालाचा अंदाज बांधता येत नव्हता. हा अपेक्षित-अनपेक्षित असा निकाल म्हणता येणार नाही. तो निकाल होता, असं तांबे म्हणाले.

follow us