Mla Shivajirao Kardile : दररोज गावामध्ये दूध गोळा करून ते तालुक्याचे ठिकाणी विकत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यापासून सुरुवात करत गावचा सरपंच ते थेट आमदारकीला गवसणी घालणारे भाजपाचे जेष्ठ नेते शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे आज निधन झाले. वयाच्या 66 व्या वर्षी कर्डिले यांचे प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अहिल्यानगर मधील एक मोठं राजकीय नेतृत्व हरपले. नगरच्या राजकारणामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटवण्यामध्ये कर्डिले यांना मोठे यश मिळाले. त्यांचा राजकीय प्रवास देखील अत्यंत रंजक राहिलायं. शिवाजीराव कर्डिले यांच्या एकूण प्रवासाबाबत आपण सविस्तर जाणून घेऊयात.
अहिल्यानगर शहरातील बुऱ्हाणनगर या ठिकाणी कर्डिले कुटुंब हे वास्तव्यास आहे. राजकारणात एन्ट्री करण्यापूर्वी कर्डिले यांनी दूध विक्री करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला. त्यानंतर राजकारणामध्ये एन्ट्री करत त्यांनी बुरानगर गावाचेच सरपंच पदाची निवडणूक लढवत ते सरपंच देखील झाले. त्यानंतर आपल्या राजकारणातील नवीन इनिंगला सुरुवात करत त्यांनी आमदारकी लढवण्याची तयारी केली.
शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ,भाजपा अशा पक्षातून त्यांनी काम पाहिले. कर्डिले हे 2009 मध्ये अपक्ष म्हणून प्रथम निवडून आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कडून लोकसभा निवडणूक लढवली होती, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2014 ला पुन्हा आमदारकी लढवत त्यांनी विजय प्राप्त केला.
भारत रशियाकडून तेल खरेदी करणार का? ट्रम्प यांच्या दाव्यानंतर भारताची पहिली प्रतिक्रिया
2019 च्या विधानसभा निवडणुकीमध्ये कर्डिले यांचा सामना राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे यांच्याशी झाला मात्र या निवडणुकीमध्ये तनपुरे यांच्याकडून कर्डिले यांना पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र पराभवानंतर खचून न जाता करडीले हे राजकारणामध्ये सक्रियच राहिले. 2024 च्या निवडणुकीमध्ये आपल्या झालेल्या पराभवाचा बदला घेत तनपुरे यांचा पराभव करत 2024 ला आमदारकीला पुन्हा एकदा गवसणी घातली.
देशातील नक्षलवाद मार्च 2026 पर्यंत समूळ नष्ट करणार; केंद्रीय गृहमंत्री अमिद शाहांचा विश्वास
मंत्रिपदाचं स्वप्न अधुरेच…
2024 मध्ये महायुतीला महाराष्ट्रामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याचा विचार केला तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 12 पैकी दहा जागेवर महायुतीची सत्ता प्रस्थापित झाली. यामुळे एक हाती विजय असलेल्या अहिल्यानगरला मंत्रिपद देखील मिळतील अशी चर्चा होती. मात्र, केवळ राधाकृष्ण विखे यांना मंत्रिपद देण्यात आले. त्यानंतर अहिल्यानगर मधील दक्षिण भागांमध्ये मंत्रिपदाच्या रेसमध्ये शिवाजीराव कर्डिले हे देखील उत्सुक होते. एक ज्येष्ठ नेते व अनुभवी तसेच माजी मंत्री राहिलेल्या कर्डिले यांना मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांचे आकस्मित निधनाने हे स्वप्न अधुरेच राहिले.