Mla Sunil Shelke : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) नाराज असल्याची चर्चा आहे. पक्षात कुठेतरी आम्ही कमी पडलो असं काही नेत्यांना वाटत आहे, असं सूचक विधान त्यांनी केलंय. रोहित पवारांच्या या विधानाचा रोख कोणाकडे आहे? याबाबत आता तर्कवितर्क लावले जात आहेत. दरम्यान, आता अजित पवार गटाचे (NCP) आमदार सुनील शेळकेंनी (Sunil Shelke) मोठं विधान केलं.
अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा…; DCM शिंदे संतापले
रोहित पवारांचा कल सत्तेकडे आणि हिंदुत्वाकडे आहे. ते लवकरच सत्तेत सहभागी होतील, असं विधान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केलं.
सुनील शेळके यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. रोहित पवारांच्या नाराजीविषयी विचारलं असता ते म्हणाले की,
रोहित पवारांनी जाहीर केलेली नाराजी ही वस्तुस्थिती आहे. रोहित पवारांना पक्षात डावललं जातं आहे. त्यामुळं त्यांना निष्ठेपेक्षा सत्तेची भूक लागली आहे. ते सत्तेच्या मार्गावर येणार आहेत, असं शेळके म्हणाले.
उन्हाळ्यात त्वचाच नाही तर केसांचं आरोग्यही येतं धोक्यात; केसांची निगा राखण्याच्या टिप्स जाणून घ्या…
पुढं ते म्हणाले की, 2024 च्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवारांचा निसटता पराभव झाला. तेव्हापासून त्यांना पक्षात खास जबाबदाऱ्या देण्यात आल्या नाही. त्यांच्या पक्षात कुठतंरी एकमेकांवर कुरघोड्या करणं, एकमेकांना शह देण्याचा प्रयत्न होत आहे. पक्षातील काही नेतेमंडळी रोहित पवारांवर नाराज असल्याच दिसतं. त्यामुळं रोहित पवार कधी सत्तेत सहभागी होतील हे सांगता येत नाही. ते कधीही सत्तेत सहभागी होऊ शकतात. रोहित पवारांचा सत्तेकडे आणि हिंदुत्वाकडे जास्त ओढा आहे. ते जरी सत्तेत येऊ इच्छित असले तरी त्यांना पक्षात आणि सत्तेत सहभागी करून घ्यायचं की नाही याबाबत आमचे वरिष्ठ नेते ठरवतील.
हल्ली आपण हिंदुत्ववादी असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न रोहित पवार करत आहे. दिवसेंदिवस ते हिंदुत्वाकडे झुकत आहेत, असं सुनील शेळकेंनी म्हटलं. तसेच जयंत पाटील हे देखील लवकरच सत्तेत सहभागी झालेले दिसतील, असंही सुनील शेळके म्हणाले.
दरम्यान, रोहित पवार यांना पक्षांतर्गत काम करण्याची संधी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, त्यांना संधी मिळाली नाही. पण, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना पक्षात चांगल्या संधी मिळाल्या आहेत. त्यामुळं ते नाराज असल्याचं दिसून येतं. अशातच आमदार शेळकेंनी रोहित पवार सत्तेत सहभागी होतील, असं विधान केलं. त्यांच्या या वक्तव्यावर आता शरद पवार गट काय प्रतिक्रिया देतो, हेच पाहणं महत्वाचं आहे.