अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा…; DCM शिंदे संतापले

Eknath Shinde on Abu Azmi : छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) जीवनावर आधारित ‘छावा’ (Chhava Film) चित्रपटाचे प्रेक्षकांकडून कौतुक होत असतानाच समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी धक्कादायक विधान केलं. औरंगजेब (Aurangzeb) हा उत्तम प्रशासक होता, अशी स्तुतीसुमनं आझमींनी उधळली. तसेच छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यात धर्माची लढाई नव्हती, असंही ते म्हणाले. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अबू आझमींवर जोरदार टीका केली.
अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शांत; विरोधी पक्षनेता कोण होणार? यावरून संभ्रम
औरंगजेबाचे उदात्तीकरण करणे अत्यंत दुर्दैवी आहे. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असं शिंदे म्हणाले.
माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे ४० दिवस हाल करून मारले. त्यांचा अपमान केला, अत्याचार केला. अशा अत्याचार केलेल्या औरंगजेबला चांगलं म्हणणं हे दुर्दैवी आहे. औरंगजेब म्हणजे क्रुरकर्मा होता. त्याने हिंदूंची मंदिरं तोडली. त्याने गरिबांना लुटले. आया-बहिणींवर अत्याचार केले. त्याने अनेकांना धर्मपरिवर्तन करायला लावलं. असा व्यक्ती चांगला प्रशासक कसा होऊ शकतो, असा सवाल शिंदेंनी केला.
रसिकलाल एम धारिवालांच्या जन्मदिनाची परंपरा कायम; 200 हून अधिक रक्तदात्यांचं अमूल्य रक्तदान
अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा…
संभाजीराजेंनी धर्माभिमान बाळगला, देशासाठी प्राणाचे बलिदान ददिले. त्यांनी धर्म, राष्ट्राभिमान सोडला नाही. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणं म्हणजे अतिशय दुर्दैवी आहे. जेवढा याचा निषेध करून, तेवढा कमी आहे, असं शिंदे म्हणाले. अबू आझमींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करायला पाहिजे, असंही ते म्हणाले. अबू आझमींनी केलेले औरंगजेबाचे कौतूक म्हणजे महापाप आहे. अबू आझमी यांनी माफी मागावी, असंही शिंदे म्हणाले.
महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार हे महाविकास आघाडीवर नाराज असल्याची चर्चा आहे. याबाबत रोहित पवार यांनी महाविकास आघाडीबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली. याबाबत विचारले असता, एकनाथ शिंदे म्हणाले, मला वाटते की महाविकास आघाडीमध्ये एकमत नाही. ते एकमेकांच्या तंगड्यात तंगड्या घालत आहेत. महाविकास आघाडी आता महाराष्ट्रात विकासविरोधी आघाडी आहे, अशी टीका शिंदेंनी केली.
आझमी नेमकं काय म्हणाले?
सपा नेते अबू आझमी म्हणाले की, औरंगजेबाच्या काळात भारताची सीमा अफगाणिस्तान आणि ब्रह्मदेशापर्यंत होती. त्या काळात भारताचा जीडीपी हा २४ टक्के होता. भारताला ‘सोने की चिडीया म्हटलं जायचं. या सगळ्या गोष्टींना मी चुकीचं म्हणू का, असा सवाल आझमींनी केला. अबू आझमी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर छत्रपती संभाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील लढाई ही सत्तेसाठी होती. ही लढाई धर्मासाठी होती.. हे जर कोणी बोलत असेल तर ते मी मानत नाही, असंही आझमी यांनी म्हटलं.