Download App

अजित पवार गटाचे आमदार आज ना उद्या अपात्र होणारच; आव्हाडांचे मोठे वक्तव्य

  • Written By: Last Updated:

Jitendra Awhad : उपमुख्यमंत्री अजित पवारांसह 40 आमदारांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. अजित पवार गटाने सत्तेत सहभाही होऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाच्या चिन्हावर दावा केला आहे. यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) गटाने अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या 12 आमदारांना नुकतीच कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. यानंतर आता शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार गटाच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. (MLAs of Ajit Pawar group will be disqualified today or tomorrow A Big statement of Jitendra Awhad)

जितेंद्र आव्हाड यांना आज माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलतांना ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार अजित पवार गटाचे आमदार आज ना उद्या अपात्र ठरतील.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शरद पवार गट आणि अजित पवार गट पक्षावर आपला दावा सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरद पवार गट) १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. याविषयी आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाचा जो आदेश आला आहे. त्यावरून हे स्पष्ट झाल आहे की, संबंधित आमदार आज ना उद्या अपात्र ठरणारच आहेत. आता प्रक्रिया सुरू झाली आहे. तिच प्रक्रिया आम्हालाही लागू होईल. त्यामुळे वरिष्ठांनी सांगितल्याप्रमाणे मी नोटीस पाठवली आहे.

बंगळुरूच्या बैठकीसाठी काँग्रेसचे स्पेशल 26, आणखी दोन पक्षांना निमंत्रण 

अजित पवार यांनी शुक्रवारी रात्री सिल्व्हर ओक येथे शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांची भेट घेतली. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना विचारले असता ते म्हणाले, ही कौटुंबिक भेट होती. प्रतिभा पवार यांच्या हातावर शस्त्रक्रिया झाली आहे. त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. शेवटी, अजित पवाराचं त्यांच्याशी कौटुंबिक नातं आहे. अजित पवार हे गेली अनेक त्यांच्या घरात रहिले आहेत.

अजित पवार आणि शरद पवार यांच्यातील लढा शेवटी वैचारिक आहे. हे रक्ताचे भांडण नाही. शरद पवारांची प्रचंड महानगा आहे. कारण नातीगोती बाजूला आणि विचार आधी… हा शरद पवारांचा किती मोठा निर्णय आहे. त्यांनी आजच्या तरुण पिढीला एक दिशा दाखवली की विचारांशी कधीही तडजोड करू नका, असं आव्हाड म्हणाले.

कोणत्या 12 आमदारांना नोटीस?
दरम्यान, शरद पवार गटानेही शुक्रवारी ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीला गैरहजर राहून पक्षविरोधी कारवाई केली, त्यामुळे अजित पवार गटातील १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये आमदार सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकापुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे आदींचा समावेश आहे.

 

Tags

follow us