Download App

मनसेचे आणखी दोन भिडू मैदानात; चंद्रपूर, राजुरा मतदारसंघात उमेदवार ठरले!

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून चंद्रपूर विधानसभा मतदारसंघाठी मनदीप रोडे तर राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं.

MNS Candiate Vidhansabha : लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) राज्यात आता विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून विविध मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली असून पक्षाकडून विविध मतदारसंघात उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून मनदीप रोडे तर राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आलीयं.

एकीकडे मविआ आणि महायुतीत जागावाटपांच्या चर्चेचं गुऱ्हाळ सुरू असतानाच राज ठाकरेंनी विधानसभेसाठी शिलेदार मैदानात उतरवण्यास सुरूवात केलीयं. मनसेकडून आगामी विधानसभा निवडणुकीत बाळा नांदगावकर यांना शिवडीतून तर पंढरपूरमधून दिलीप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर झालीयं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वत: याबद्दलची घोषणा केली. येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे 225 ते 250 जागा लढवणार असल्याची घोषणा राज ठाकरेंनी केली होती. त्यानंतर आता मनसेच्या उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येत आहे.

झेड प्लस सुरक्षा म्हणजे काय? VIP अन् नेत्यांना किती प्रकारची सुरक्षा, जाणून घ्या डिटेल…

तसेच मनसेचे हिंगोली जिल्हाप्रमुख प्रमोद (बंडू कुटे) यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलीयं. आता पुन्हा दोन उमेदवारांची घोषणा करण्यात आलीयं. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यांनी आपले उमेदवारही रिंगणात उतरवले नव्हते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही त्यांच्याकडून अशीच भूमिका घेतली जाईल असे वाटत होते. परंतु, त्यांनी नवी रणनीती आखत स्वबळावर लढण्याची घोषणा केली. फक्त घोषणा करूनच राज ठाकरे थांबले नाहीत तर त्यांनी राज्याचा दौरा सुरू केला आहे. सहा उमेदवारही फायनल केले आहेत.

रोहिणी हट्टंगडी यांना, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2024 अनुराधा पौडवाल यांना प्रदान

दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी आतापर्यंत सात उमेदवारांची नावं जाहीर केली असल्याची माहिती समोर आलीयं. शिवडी मतदारसंघातून बाळा नांदगावकर, वरळी मतदारसंघातून संदीप देशपांडे, पंढरपूरमधून दिलीप धोत्रे, हिंगोली मतदारसंघातून बंडू कुटे, चंद्रपूर मतदारसंघातून मनदीप रोडे, राजुरा मतदारसंघातून सचिन भोयर, यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच लातूर ग्रामीण मतदारसंघातून संतोष नागरगोजे यांचं नाव फायनल करण्यात आल्याची चर्चा आहे. राज ठाकरे यांच्या या खेळीने महाविकास आघाडी आणि महायुती दोघांतही अस्वस्थता निर्माण झाली आहे. निवडणुकीसाठीचा राज ठाकरेंचा हा डावा कुणाला फटका देतोय याचं उत्तर निकालानंतरच मिळणार आहे.

follow us