Raj Thackeray : एकनाथ शिंदे ज्यावेळी शिवसेनेतून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासह शिंदे गटातील आमदारांना महाविकास आघाडीकडून खोके, गद्दार म्हणून टीका केली गेली. अजूनही खोकेबहाद्दर बोलले जात आहेच. मात्र आज दीड वर्षांनंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाकरे पनवेल येथील मेळाव्यात हा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटावर घणाघाती टीका केली.
पनवेल येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात राज ठाकरे यांनी मुंबई-गोवा महामार्गासाठी आंदोलन सुरू करण्याचे आदेशच मनसैनिकांना दिले. तसेच सत्ताधारी भाजपसह विरोधी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही कठोर शब्दांत टीका केली. राज ठाकरे म्हणाले, आज जे खोके खोके म्हणून ओरडत आहेत ना त्यांच्याकडे तर कंटेनर आहे. यांनी तर कोविड सुद्धा सोडला नाही. आता बाळासाहेबांच्या नावाने मते मागायला येतील. त्यामुळे आपण कोणाला मतदान करतोय याचा विचार करा.
राज ठाकरेंनी हिंदुत्वावरुन कूस बदलली; निवडणुकांपूर्वी पुन्हा खेळलं मराठी कार्ड?
मी आज येथे मोठे भाषण करण्यासाठी नाही तर आंदोलनाला हिरवा झेंडा दाखविण्यासाठी आलो आहे. मला अजून कळलं नाही जे चंद्रयान चंद्रावर गेलं त्याचा काय उपयोग. तिथे जाऊन काय करणार तर खड्डेच पाहणार ना. त्यापेक्षा एखादं यान महाराष्ट्रात सोडलं असत तर किमान खर्च तरी वाचला असता असा टोला त्यांनी लगावला. ते पुढे म्हणाले, मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे काही आजचे नाहीत. 2008 साली या स्त्याचे काम सुरू झाले. सरकारं बदलली. पण तरीही रस्त्याचे काम काही झाले नाही. तरी सुद्धा लोक त्याच त्याच पक्षातल्या लोकांना मतदान कसं करता याचं मला आश्चर्य वाटत. लोकांना असं कधी वाटत नाही का की या लोकांना घरी बसवावे त्यांना चांगला धडा शिकवावा, असा सवाल राज ठाकरे यांनी विचारला.
‘मलाही चेकमेट करण्याचा डाव पण, आम्ही राजकारणातले ग्रँडमास्टर’; CM शिंदेंची विरोधकांवर तिरकी चाल
पंतप्रधान मोदींनी काही दिवसांपूर्वी आपल्या भाषणात भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला अन् लगेच विरोधी पक्षातील लोक उड्या मारून सरकारमध्ये आले. कशाला खोटं बोलता. या सगळ्या गोष्टी घडत असताना लोकांना त्रास होतोय. तरी त्याच त्याच लोकांना मतदान होतंय हे मला कळलं नाही की जनतेला खरंच काय हवंय काम नको मग तीच माणसं हवीत का असे म्हणत या गोष्टी सुधारायच्या असतील एकदा माझ्या हातात सत्ता देऊन पहा, असेही ठाकरे म्हणाले.