Download App

‘एवढचं वाटतंय तर आधी महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या’; राज ठाकरेंची टीका

निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचले.

  • Written By: Last Updated:

One Nation One Election: अलीकडेच माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्या अध्यक्षतेखालील समितीने वन नेशन वन इलेक्शन (One Nation One Election) संदर्भातला अहवाल केंद्राला सोपविला होता. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने आज वन नेशन, वन इलेक्शन या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. दरम्यान, यावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) प्रतिक्रिया दिली.

जम्मू-काश्मीरमधील निवडणुकीचा पहिला टप्पा संपला, 24 जागांवर 58.85 टक्के मतदान 

निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, अशा शब्दात राज ठाकरेंनी सरकारचे कान टोचले.

राज ठाकरेंनी ट्वीटरवर एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लिहिलं की, एक देश एक निवडणूक संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली. अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेची मान्यता लागेल आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौलपण विचारात घ्यावाच लागेल. या कौलाचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकारांनी राज्यांच्या अधिकारांना, स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही, याची खातरजमा पण व्हायला हवी, असं राज ठाकरे म्हणाले.

सावधान, देशात मंकीपॉक्सचा दुसरा रुग्ण, UAE मधून परतलेला व्यक्ती पॉझिटिव्ह 

पुढं त्यांनी लिहिलं की, बरं जर एखाद्या राज्यात सरकार पडलं किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणूक होणार का? त्या राज्याने लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पहायची? किंवा समजा काही कारणामुळं लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका लागल्या तर देशातल्या सगळ्या निवडणुका परत होणार का? असा कोणताही खुलासा झालेला नाही. तो कदाचित होईल, असं ते म्हणाले.

पण, ‘एक देश एक निवडणूक’ हे सर्व ठीक आहे. आधी राज्यातल्या महापालिका, नगरपालिकांच्या निवडणुका घ्या. येत्या ऑक्टोबर 2024 अनेक महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये प्रशासक होऊन 4 वर्षे पूर्ण होतील. एवढा काळ नगरसेवक नाहीत म्हणजे लोकप्रतिनिधी नाहीत. ते जास्त महत्वाचं नाही का? स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सर्वसामान्य लोकांच्या जीवनाशी, त्यांच्या प्रश्नांशी असतो. त्याच्यात निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडे ? निवडणुकांचं महत्व इतकंच वाटतंय तर या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या, असं राज ठाकरे म्हणाले.

follow us