Mns Gudipadawa Melava Raj Thackeray In Mumbai : शिवाजी पार्क मैदानावर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) गुढीपाडवा मेळावा आहे. मेळाव्याआधीच जोरदार बॅनरबाजी करत मनसेनं वातावरण तापवलं आहे. दरवर्षी गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर (Gudipadawa Melava) मनसे अध्यक्ष राज ठाकरे भव्य मेळावा घेतात. या मेळाव्यामधून राज ठाकरे सरकारवर तोफ डागतात. मनसेचे ही परंपरा मागील 19 वर्षांपासून सुरू आहे. आज देखील शिवाजी पार्क मैदानावर राज ठाकरे यांची भव्य सभा पार पडली. यावेळी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनसे सैनिकांनी हजेरी लावली. राज ठाकरेंनी (Raj Thackeray) उपस्थित जनसमुदायाला मेळाव्यातून संबोधित केलंय.
जमलेल्या माझ्या तमाम हिंदू भगिणींनो आणि बांधवांनो, असं म्हणत आज गुढीपाडवा मेळाव्यात आपल्या भाषणाला सुरूवात केली. यावेळी त्यांनी सर्वांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो. गेल्या निवडणुकीत ज्यांनी मतदान करून, (Raj Thackeray Gudipadawa Melava) ज्यांची मतं दिसली त्या सर्व मतदारांचे आभार. ज्या मतदारांनी मनसेला मतदान करून देखील, मशीनमध्ये मते दिसली नाहीत. त्यांचेही आभार. जे झालं ते झालं, आता पुढचं बघायचं, सगळे वेळ काढून आलात ना, बरंच बोलायचं मला असं देखील यावेळी राज ठाकरेंनी म्हटलंय.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, सामने कधी अन् कुठे खेळले जातील? घ्या जाणून…
औरंगजेबाच्या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आम्ही कोणाला गाडलंय ते सांगायला नको. लहान -लहान मुलांना घेवून तिकडे गेलं पाहिजे. त्यांना सांगितलं पाहिजे, महाराजांनी याला गाडलं. पुढच्या पिढीला आम्ही काय इतिहास सांगणार? असं देखील राज ठाकरेंनी विचारलं. महाराजांना विचारूनच औरंगजेबाला तिथं गाडलं असेल. जातीपातीचे विषय काढून विषय भरकटवले जातात, असं देखील राज ठाकरेंनी म्हटलंय.
निवडणुका झाल्यानंतर अनेक विषय झाले. अनेक विषय बोलले गेले. कुंभमेळ्याचं पाणी आमच्या बाळा नांदगावकरने आणलं. त्यांनी मी पिणार नाही, असं सांगितलं. तेव्हा नव्यानं वारं शिरलेल्या काहींना वाटलं मी, हिंदुत्वाचा अपमान केला. मूर्ख आहात का? असं देखील राज ठाकरेंनी विचारलं. आपल्या देशातल्या नद्यांची भीषण अवस्था आहे, ज्याला आपण माता म्हणतो. देवी म्हणतो नदीला, त्या नद्यांकडे आपल्या राज्यकर्त्यांचं दुर्लक्ष आहे.
भाविकांसाठी 5 लाखांचा विमा… साईबाबा संस्थानचा महत्वाचा निर्णय, योजनेत नक्की काय?
लाखो लोक तिथे अंघोळ केल्यानंतर आजारी पडले, असं उत्तरेकडील लोकांनी सांगितलं. प्रश्न गंगेच्या अपमानाचा नाही, तर पाण्याच्या स्थितीचा आहे. यावेळी राज ठाकरेंनी गंगेची अवस्था दाखवणारा व्हिडिओच प्ले केलाय. आतापर्यंत तेहतीस कोटी रूपये खर्च झालेत. तिथल्या घाटांवर प्रेत जाळली जात आहे. नुसतं अग्नी दिल्यासारखं करतात अन् प्रेत नदीत धकलून देतात, हा कोणता धर्म? महंतांचा प्रेत जशेच्या तसे नदीत ढकलून दिले. या नद्या आपणच धर्माच्या नावाखाली बदनाम करतोय, असं देखील यावेळी बोलताना राज ठाकरेंनी म्हटलंय.