भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर, सामने कधी अन् कुठे खेळले जातील? घ्या जाणून…

India Australia Series Schedule In Detailed : सध्या सगळीकडे आयपीएल 2025ची चर्चा (India Australia Series) सुरू आहे. याच दरम्यान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाच्या दौऱ्याचं वेळापत्रक जाहीर केलंय. टीम इंडिया यावर्षी (Cricket News) पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. यावेळी एकदिवसीय सामने आणि टी-20 दोन्ही खेळले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियाने यासाठी वेळापत्रकही जाहीर (India Australia Series Schedule) केले आहे.
रतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर प्रथम एकदिवसीय मालिका खेळणार आहे. 2023 मध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर, दोन्ही संघ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आमनेसामने आले होते. तिथे भारताने ऑस्ट्रेलियाला हरवलंय. हा दौरा 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत होणार आहे. या काळात कोणतीही कसोटी मालिका खेळली जाणार नाही, कसोटी मालिका दोन वर्षातून एकदाच होते.
काही काम केलं नाही, तरी थकल्यासारखं वाटतंय? गंभीर आजाराचे लक्षण…
बऱ्याच काळानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये द्विपक्षीय मालिका होणार आहे. एकदिवसीय मालिकेत एकूण तीन सामने खेळवले जातील. यानंतर मालिका टी-20 मध्ये खेळवली जाईल. तेथे एकूण पाच सामने आयोजित केले आहेत. अशाप्रकारे एकूण आठ सामन्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय संघ या वर्षी ऑक्टोबरमध्ये ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे.
भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
एकदिवसीय मालिका
पहिला एकदिवसीय सामना – 19 ऑक्टोबर, पर्थ
दुसरा एकदिवसीय सामना – 23 ऑक्टोबर, अॅडलेड
तिसरा एकदिवसीय सामना – 25 ऑक्टोबर, सिडनी
भाविकांसाठी 5 लाखांचा विमा… साईबाबा संस्थानचा महत्वाचा निर्णय, योजनेत नक्की काय?
टी-20 मालिका
पहिली टी-20 – 29 ऑक्टोबर, कॅनबेरा
दुसरी टी-20 – 31 ऑक्टोबर, मेलबर्न
तिसरी टी-20 – 2 नोव्हेंबर, होबार्ट
चौथी टी-20 – 6 नोव्हेंबर, गोल्ड कोस्ट
पाचवी टी-20 – 8 नोव्हेंबर, गाब्बा