Mohit Kamboj : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Election Result) जाहीर होताच आता राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील सरकारमधून मला मुक्त करण्यात यावे अशी मागणी पक्ष नेतुत्वाकडे करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये दिली. यानंतर राज्यातील राजकारणात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
यातच आता भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांनी देखील एक ट्विट करत फक्त एका व्यक्तीचं महत्त्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान करण्यात आलं असा खबळजनक ट्विट केला आहे. या ट्विटनंतर मोहित कंबोज यांचा रोष कुणाकडे होता याची चर्चा जोराने सुरु आहे.
काय म्हणाले मोहित कंबोज
भाजप नेते मोहित कंबोज यांनी ट्विट करत म्हणाले की, महाराष्ट्र भाजप आणि मुंबई भाजपने आत्म्परिक्षण करायला हवं, फक्त एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान केलं आहे यामुळे राज्यातील मंत्री आणि जेष्ठ नेतेही पराभवासाठी जबाबदार आहेत असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. मात्र त्यांनी आपल्या या ट्विटमध्ये कुणाचीही नाव न घेतल्याने त्यांच्या रोख कोणाकडे होता याची चर्चा आता जोरात राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.
चार जून रोजी जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजप फक्त 9 जागा जिंकता आले आहे तर महायुतीतील घटकपक्ष शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे.
काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस
पत्रकार परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस म्हणाले, पुन्हा एकदा देशातील जनतेने एनडीएला पूर्ण बहुमत दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे. इंडिया आघाडीने जितके जागा जिंकले आहे त्यापेक्षा जास्त जागा भाजपने जिंकले मात्र आम्हाला राज्यात अपेक्षा प्रमाणे यश मिळालेला नाही.
राज्यातील घडामोडींना वेग.., महायुती फुटीच्या उंबरठ्यावर
प्रचारादरम्यान भाजप राज्यघटना बदलेल असा खोटा प्रचार विरोधकांनी केला होता आणि या नेरेटिव्हचा फटका आम्हाला मोठ्या प्रमाणात बसला आहे. याच बरोबर राज्यात काही भागात मराठा आरक्षणाचा फटका आम्हाला बसला यामुळे राज्यात एनडीएची कामगिरी ढासळली अशी कबुली देत फडणवीसांनी मला सरकारमधून मोकळा करावे अशी मागणी पक्ष नेतृत्वाकडे केली.