Download App

Beed Politics : ‘…तर मी धनंजय मुंडेंचा जाहीर सत्कार करेन’; बजरंग सोनवणेंचं मोठं विधान

धनंजय मुंडेंनी 'एनडीआरएफ'चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन.

  • Written By: Last Updated:

MP Bajrang Sonwane : अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात (Marathwada) शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे एनडीआरएफच्या (NDRF) निकषांच्या पलीकडे जाऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारचा प्रयत्न राहील, असे आश्वासन कृषिमंत्री धनंजय मुंडे (Minister Dhananjay Munde) यांनी दिलं होतं. त्यांच्या या आश्वासनावर आता बीड लोकसभा मतदारसंघाचे खासदार बजरंग सोनवणे (MP Bajrang Sonwane) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हाजी अराफत शेख यांच्याशी आमचे चांगले संबंध; ‘त्या’ वक्तव्याच्या वादावर नितेश राणेंचं पांघरुण 

धनंजय मुंडेंनी ‘एनडीआरएफ’चे सर्व निकष मोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन, असं वक्तव्य करत सोनवणेंनी मुंडेंच्या आश्वासनाला आव्हान दिल.

सोनवणेंनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आमल्या जिल्ह्यावर निसर्गाची अवकृपा आहे. बीड जिल्ह्यात पाऊस कधी कमी तर कधी जास्त असतो. त्यामुळे कोणत्या परिस्थितीत शेती करावी, हा देखील प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली. कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी शेतकऱ्यांसाठी काम करावे. मुंडे यांनी बीडमधील एका गावातील दौऱ्यावेळी आश्वासन दिलं की, आम्ही ‘एनडीआरएफ’चे सर्व निकष मोडून सर्व शेतकऱ्यांना तीन हेक्टरपर्यंत सरसकट मदत करू. त्यांतर मी त्याचं दिवशी सांगितलं की, जर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी एनडीआरएफचे सर्व निकष तोडून तीन हेक्टरपर्यंत शेतकऱ्यांना मदत केली आणि शेतकऱ्यांना अनुदान दिले तर मी त्यांचा जाहीर सत्कार करेन. बीड जिल्ह्याचा खासदार या नात्याने मी त्यांचा सत्कार करणार आहे, असं सोनवणेंनी म्हटलं.

यांची गोची करा, राजकीय सभेला जाऊ नका, जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन 

सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असतानाच सोनवण यांनी मंत्री मुंडे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरूनही जोरदार चर्चा रंगली.

परळी विधानसभेबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही…
पुढं ते म्हणाले, बीड जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीसाठी एवढी उत्सुकता लोकांमध्ये आहे की, कधी निवडणूक कधी जाहीर होते आणि ज्या प्रकारे लोकसभा निकाला दिला तसा विधानसभेचा निकाल आम्ही कधी देतो, यासाठी लोकांमध्ये उत्सुकता आहे. लोकसभा निवडणुकीपासून आमच्याकडे अनेकांची गर्दी होत आहे. विधानसभेसाठी उमेदवारीची मागणी होत आहे. त्यावर पक्ष योग्य तो निर्णय घेईल, योग्य उमदेवार देईल. मात्र, आमच्या पक्षाने परळी विधानसभा मतदारसंघाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही, असे सोनवणे यांनी सांगितले.

follow us