यांची गोची करा, राजकीय सभेला जाऊ नका, जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

  • Written By: Published:
यांची गोची करा, राजकीय सभेला जाऊ नका, जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

Manoj Jarange Patil : मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा एकदा 17 सप्टेंबरपासून आरक्षणासाठी (Maratha Reservation) आमरण उपोषण करणार आहे. मात्र त्यापूर्वी त्यांनी मराठा समाजाला आवाहन करत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका असा आवाहन मराठा समाजाला केला आहे. ते बीडच्या बेलगाव येथे बोलत होते.

यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षणासाठी माझं आमरण उपोषण 17 तारखेपासून सुरु होणार आहे. उपोषणापूर्वी आराम आवश्यक असतो म्हणून उद्यापासून कोणत्याही कार्यक्रमाला जाणार नाही. मी मुद्दाम उपोषण करत नाही. माझा मायबाप समाज आरक्षणाची आशेने वाट पाहत आहे. समाज म्हणतो आमच्या लेकरांची शेवटची आशा तुम्ही आहात आणि त्यामुळे जर सरकार आरक्षण देणार नसेल तर मला माझ्या समाजासाठी लढावे लागणार आहे. माझा जीव गेला तरी हरकत नाही असं यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, जर आरक्षण मिळालं तर ते सूर्य चंद्र असेपर्यंत राहील.आरक्षण आपला हक्क आहे. राजकीय लोकांना आता डोळ्यासमोर ठेऊ नका. समाजाच्या लेकरांसाठी मी जीवाची बाजी लावत आहे. आरक्षण मिळाल्यावर माझा समाज मोठा होणार असेही यावेळी जरांगे पाटील म्हणाले. तसेच आपल्या विरोधात राज्यभरात आंदोलन उभे राहत आहेत, आपल्यात फूट पडली जात आहे मात्र भावनिक होऊ नका. आता 1500 रुपये दिल्याने तुमचं आयुष्य मार्गी लावणार नाही ते आपले पैसे आहेत आणि या पैशांसाठी देवेंद्र फडणवीस यांनी वावर विकले नाही. सरकारने लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले मग भाच्याचे काय? त्याला आरक्षण पाहिजे असा सवाल देखील यावेळी त्यांनी उपस्थित केला.

काश्मिरच्या इलेक्शमध्ये इंजिनिअर राशिदची एन्ट्री! लोकसभेची पुनरावत्ती होणार?

आता कोणत्याही राजकीय नेत्यांच्या सभांना जाऊ नका, त्यामुळे सर्व राजकीय पक्षांची गोची होणार. मराठा समाजाने आधीच नेत्यांना गावबंदी केली होती आता मराठा समाज सभेला नाही आला तर राजकीय पक्षांना बड्या नेत्यांच्या सभेसाठी गर्दी जमवणं कठीण होणार त्यामुळेर राजकीय सभेला जाऊ नका असा आवाहन देखील जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला बीडमध्ये बोलताना केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube