Download App

राज्य गुंडांच्या तावडीत, फडणवीस राजीनामा द्या; घोसाळकर गोळीबारानंतर राऊतांचे टीकास्त्र

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : ठाकरे गटाचे माजी नगरसेवक भिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांच्यावर मॉरिस (Morris) नामक व्यक्तीने पाच राऊंड फायर करत गोळीबार (firing) केला आहे. या घटनेमध्ये गंभीर जखमी झालेल्या अभिषेक घोसाळकर यांना त्यांना तत्काळ करुणा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात केलं. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच आक्रमक झाले. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवी (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. राज्य गुंडाच्या तावडीत आहे, फडणवीस राजीना द्या, अशी मागणी राऊतांनी केली.

वंचितने ‘मविआ’ला दिली कॉमन मिनिमम मागण्यांची मोठी यादी, इंडिया आघाडीसमोर पेच 

दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला. या गोळीबाराच्या घटनेनंतर राऊतांनी ट्वीट करत सरकारवर निशाणा साधला. राऊत यांनी ट्विट करत लिहिलं की, महाराष्ट्रात गुंडांचे राज्य सुरू आहे असे मी रोज सांगत आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचे बाळराजे रोज गुंड टोळ्याना भेटतात. पक्षात प्रवेश देतात .गृहमंत्री अदृश्य झाले आहेत..राज्य गुंडांच्या तावडीत आहे. म्हणूनच कायद्याची भीती उरली नसून पोलिस हे शिंदे गँगच्या सेवेसाठीच उरले आहेत, अशी टीका राऊतांनी केली.

महाराष्ट्रात इंडिया आघाडीच बाजी मारणार! 48 पैकी 26 जागा जिंकणार, मूड ऑफ नेशनचा सर्व्हे 

त्यांनी पुढं लिहिलं की, अभिषेक घोसाळकर यांच्यावरील गोळीबार धक्कादायक आहे.अभिषेक मृत्यूशी झुंज देतोय..आणि गृहमंत्री फडणवीस चाय पे चर्चा करीत फिरत आहेत! फडणवीस राजीनामा द्या!, असं राऊत म्हणाले.

नेमकं काय घडलं?
अभिषेक घोसाळकर आणि मॉरिस हे पूर्वीपासूनच एकमेकांना ओळखत होते. वर्षभरापूर्वी दोघांमध्ये वाद झाला होता. दोघांमधील वाद मिटल्यानंतर आज दोघेही मॉरिसच्या कार्यालयात एकत्र आले होते. मॉरिसने अभिषेक घोसाळकर यांना स्वत:च्या कार्यालयात बोलावून फेसबुक लाईव्ह केले. त्यावेळी दोघांनी एकमेकांसाठी कौतुकास्पद शब्द वापलले.

दोघांमधील संभाषण झाल्यानंतर अचानक मॉरिसने घोसाळकर यांच्यावर गोळीबार सुरू केला. मॉरिसने एकूण 5 राऊंड फायर केले, त्यापैकी तीन गोळ्या घोसाळकर यांना लागल्या. अभिषेक घोसाळकर यांच्या डोक्यात गोळी लागली. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला.

follow us