राज्यात गुंडांचं सरकार बसलंय; घोसाळकर गोळीबारानंतर ठाकरेंची टीका

राज्यात गुंडांचं सरकार बसलंय; घोसाळकर गोळीबारानंतर ठाकरेंची टीका

Aaditya Thackeray Speak on Abhishek Ghosalkar : राज्यात गुंडांचं सरकार बसलं, असल्याची खरमरीत टीका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी केली आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आल्याची घटना दहीसरमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये अभिषेक घोसाळकर गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या गोळीबाराच्या घटनेनंतर आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली आहे.

Pune Metro : नदी पात्रांच्या भुयारातून धावली मेट्रो; बुधवारपेठ, मंडई, स्वारगेट कशी आहेत स्थानकं?

आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात नेमकं चाललंय तरी काय? जळगावमध्ये भाजपच्या नगरसेवकावर गोळीबार झाला आहे. त्यानंतर आता दहीसरमध्ये ही गोळीबाराची घटना घडली आहे. राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा धाक राहिला आहे की नाही. राज्यात नक्की कोण सुरक्षित आहे. अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झाल्यानंतर आता त्यांनी प्रकृती चिंताजनक आहे. त्यांची आणि माझी भेट झाली होती. त्यानंतर हा प्रकार घडला आहे. जो धाक असायला पाहिजे तो आता राज्यात राहिलेला नाही. असंच वातावरण राहिलं तर अवघड होईल, राज्यात सध्या गुंडांचंच सरकार बसलं असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे.

Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांच्या घरावर आयकर विभागाचा छापा; झाडाझडती सुरू

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज